शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सातारा शहराला वादळी वाऱ्यासह पावासाने झोडपले, तुफान पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:03 PM

सातारा शहराला गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. या पावसामुळे हवेतील उकाडा काही प्रमाणात कमी झाला. जिल्ह्याच्या विविध भागात झाडावरील आंबे झडून पडले. तर अनेक फळभाज्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

ठळक मुद्दे सातारा शहराला वादळी वाऱ्यासह पावासाने झोडपले, तुफान पाऊसतासभर हजेरी; जिल्ह्यात आंब्यासह बागायती पिकांचे नुकसान

सातारा : सातारा शहराला गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. या पावसामुळे हवेतील उकाडा काही प्रमाणात कमी झाला. जिल्ह्याच्या विविध भागात झाडावरील आंबे झडून पडले. तर अनेक फळभाज्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.गेल्या काही दिवसांपासून हवेत उकाडा वाढला होता. या वातावरणात कुठल्याही वेळी वळवाचा पाऊस कोसळू शकतो असे अंदाज बांधले जात होते. आभाळ भरुन येत होते परंतु पावसाने हुलकावणी दिली होती. गुरुवारी मात्र सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवला.

वाराही वेगाने वाहत राहिला. दुपारनंतर आकाशात काळे ढग गोळा झाले. सोसाट्याचा वारा सुटला आणि सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रस्त्यावर स्मशान शांतता पसरलेली असतानाच पावसाने अचानक हजेरी लावून नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला. शहरातील प्रत्येक गल्लीत बच्चे कंपनी नाचत बागडत पावसात भिजताना पाहायला मिळत होती. सुमारे तासभर पडलेल्या या पावसात मुलांसोबत मोठ्या माणसांनीही भिजण्याचा आनंद घेतला.शहरातील समर्थ मंदिर, राजवाडा, मोती चौक, राधिका चौक, पोवई नाका, राजपथ, शाहू चौक, सदरबझार, मध्यवर्ती बस स्थानक, सुभाषचंद्र चौक या भागात रस्ता मोकळा असल्याने अनेक जण पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी रस्त्यावर आलेले पाहायला मिळाले. कोरोनाची दहशत मोडून काढत लोकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.शहरात बंदोबस्तासाठी सज्ज असलेल्या पोलिसांची पावसामुळे पळापळ झाली. तर जीवनावश्यक वस्तू भाजा खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या सातारकरांना धावतच घर गाठावे लागले.या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले उताराचा रस्त्यावरून पाणी वेगाने वाहताना दिसत होते तर सखल भागांमध्ये पाणी साठले. जिल्ह्यात विविध ठिकाणी गारांचा पाऊस झाला असल्याने आंबा, द्राक्ष या फळांसोबतच शेतातील टोमॅटो, काकडी, दोडका, कार्ली, या पिकांचे तसेच केळी, पपईच्या भागांचे मोठे नुकसान झाले आहे.वीज गायबपावसाने हजेरी लावतात शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडत असल्याने विभागाने खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरातील वीजपुरवठा खंडित केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस