सातारा : पालिका प्रशासनाकडून शहराच्या विकासासाठी प्रयत्न सुरु असतात, मात्र पालिका प्रशासनाला एक मार्गदर्शक किंवा सुचक म्हणून जागरुक नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. वार्ड समितीच्या निमित्ताने सातारा जागरुक नागरिक संघाची स्थापना झाली असून या संघातील सदस्यांनी आपआपल्या वार्डातील समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केल्यास शहरातील सर्व समस्यांचा निपटारा होवून शहराचा कायापालट होईल, असा विश्वास आमदार शिवेंदसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.वार्ड कमिटीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, जेष्ठ नागरिक रामदास बल्लाळ, रघुनाथ राजमाने, हेमंत कासार, चंद्रकांत जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, निवडणूकीसाठी कमिटी स्थापन करण्यात आलेली नसून सातारा शहरातील प्रत्येक वार्डातील गल्ली बोळातील समस्यांचे निराकणर करणे, नागरिकांच्या प्रश्नांची प्रभावीपणे सोडवणूक करणे, यासाठी जागरुक नागरिकांची मोट बांधण्यात आली आहे. राजकारणाला थारा न देता शहरातील समस्या सोडविण्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून ही कमिटी कार्यरत राहिल. यावेळी डॉ. गोडबोले, हेमंत कासार यांनी वार्ड कमिटीमार्फत केल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. (प्रतिनिधी)... त्यांची आत्ताच दूर रहावे : वेदांतिकाराजे कमिटी गठीत करण्याचे कारण विषद करून वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, लोकांनी लोकांसाठी सुरु केलेली ही एक चळवळ असून या चळवळीच्या माध्यमातून सातारा शहराचा कायापालट करायचा आहे. अनेक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या सातारा शहरात जागरुक नागरिक संघ ही संकल्पना अल्पावधीत आदर्श ठरवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ही कमिटी पुर्णपणे राजकारणविरहीत असून नगरसेवक पदाच्या अपेक्षेने कोणी इथे आले असतील तर, त्यांनी आत्ताच कमिटीपासून दूर रहावे.
जागरुक नागरिकांमुळेच शहराचा कायापालट होईल : शिवेंद्रसिंहराजे
By admin | Published: June 16, 2015 10:25 PM