सातारा : दीपावलीचा उत्सव चारच दिवसांत संपला आणि शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा येऊन साचला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शेकडो टन कचरा येऊन पडला आहे. यामध्ये फटाक्यांचे कागद आणि प्लास्टिकचा समावेश आहे. त्यातच गेले दोन सातारा शहर आणि परिसरात हलक्या सरी कोसळत असल्यामुळे गारवा जाणवू लागल्याने सातारकर चांगलेच हैराण झाले असतानाच रस्त्यावर अनेक ठिकाणी साचून राहिलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. दीपावलीनिमित्त साताऱ्यातील अनेक रस्ते गेले काही दिवस गर्दीने फुलले होते. याच काळात अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी रस्त्यांवर दुकानेही टाकली होती. या कालावधीत झालेला कचरा अजूनही दूर झालेला नाही. तो तसाच रस्त्यावर पडून राहिल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावरून येणारे-जाणारे पादचारी मात्र नाकाला रुमाल लावूनच जात आहेत.यशवंतराव चव्हाण यांचा पोवई नाक्यावर पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या बाजूलाच नेहमी कचरा टाकला जातो. या अनुषंगाने अनेकदा तक्रारी झाल्यानंतरही त्याकडे सातारा नगरपालिका कधी गांभीर्याने पाहत असल्याचे ऐकिवात नाही. दीपावलीच्या कालावधीत अनेक फूल विक्रेते येथे बसतात; मात्र तेही येथेच कचरा करून जातात. पालिका कर्मचाऱ्यांनी वारंवार या मंडळींना सूचना केल्यानंतरही कोणत्याही उपाययोजना आखल्या जात नाहीत. बसस्थानक परिसरालगतच सकाळी सहा ते नऊ या वेळेत मंडई भरते. येथे ग्रामीण भागातून शेतकरी आपला माल विकण्यासाठी येतात. ताजा भाजीपाला मिळत असल्याचे सातारकरांची येथे खरेदीसाठी गर्दी असते. मात्र, अनेक शेतकरी मंडईची वेळ संपली की राहिलेला खराब माल आणि उर्वरित कचरा बाजूलाच उचलून टाकतात. मात्र, याचा सर्वात मोठा फटका बसस्थानक येणाऱ्या प्रवाशांना बसतो कारण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. (प्रतिनिधी)जेथे इशारा, तेथेच कचराकोणत्याही शहराचे प्रवेशद्वार पाहिले की, त्या शहरातील स्वच्छतेचा अनुभव अनेकांना येत असतो. सातारा शहरातील अनेक रस्त्यांवर मात्र बाहेरून येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा अनुभव येत आहे. प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. सातारा शहरात अनेक ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून इशारा देण्यात आला आहे. याचे उल्लंघन झाले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. मात्र, जेथे इशारा, तेथेच कचरा टाकण्यात सातारकरांनी धन्यता मानली आहे. ‘येथे कचरा टाकू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल’ असे मोठ्या अक्षरात लिहिल्यानंतरही अगदी बरोबर त्याच्या खालीच कचरा करण्यात सातारकरांनी धन्यता मानली आहे. विसावा नाका परिसरात हे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. बसस्थानक परिसर, पोवईनाका, जुनी मंडई येथे अनेकदा कचरा दिसून येतो. एवढे होत असतानाही सातारा पालिका मात्र त्यावर काही उपाययोजना आखत नाही.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा सातारा शहरातील पोवई नाक्यावर पुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्याच्या बाजूलाच कचरा टाकण्यात येतो. विशेष म्हणजे, या अनुषंगाने अनेकदा तक्रारी झाल्यानंतरही त्याकडे पालिका गांभीर्याने पाहत नाही. कचऱ्याची केली शेकोटीवातारवणातील बदल आणि दोन दिवस पडणाऱ्या हलक्या सरी यामुळे सातारा शहरात गेले दोन दिवस गारवा जाणवत आहे. त्याचा फटका अनेकांना बसत असून, सातारकर बाहेरच पडायला तयार नाहीत. त्याची प्रचितीही आली. एक वयोवृद्ध मात्र पावसाचा शिडकावा होत असतानाच घराबाहेर पडले होते आणि त्यांनी प्रशासकीय इमारतीनजीक एका झाडाखाली पडलेला कचरा पेटवून पाय शेकत होता.शासकीय कर्मचाऱ्यांची अनास्थासातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानजीक असणारी कचराकुंडी ओसंडून वाहत आहे. विशेष म्हणजे, येथे कचरा करणारी माणसे सरकारी कर्मचारी आहेत. कारण याच्यापुढे असणारी वसाहत शासकीय कर्मचाऱ्यांची आहे. त्यांच्यासाठीच येथे कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. ही मंडळीदेखील कुंडीमध्ये नीटपणे कचरा टाकत नाहीत. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीचा फटका अनेकांना बसत आहेत. कारण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रोज हजारो नागरिक येतात. दरम्यान, येथून जाणारे दुचाकीस्वार तोंडाला रुमालच बांधून जातात.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा सातारा शहरातील पोवई नाक्यावर पुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्याच्या बाजूलाच कचरा टाकण्यात येतो. विशेष म्हणजे, या अनुषंगाने अनेकदा तक्रारी झाल्यानंतरही त्याकडे पालिका गांभीर्याने पाहत नाही. सातारा बसस्थानक परिसरालगतच सकाळी सहा ते नऊ या वेळेत मंडई भरते. मंडई संपली की येथील कचरा बाजूलाच उचलून टाकला जातो. हजारो किलो कचरा येथेच पडून राहिल्यामुळे बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरते.
शहरातील कचरा बनतोय डोकेदुखी
By admin | Published: October 26, 2014 9:14 PM