शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटांत हाणामारी, चौघे ताब्यात; साताऱ्यातील घटना 

By दत्ता यादव | Published: December 27, 2023 3:44 PM

सातारा : येथील जिल्हा न्यायालयाच्या मुख्य रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ...

सातारा : येथील जिल्हा न्यायालयाच्या मुख्य रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चार तरुणांना ताब्यात घेतले. हा प्रकार बुधवारी दुपारी दीड वाजता घडला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महाविद्यालय सुटल्यानंतर काही मुले चालत सहकार न्यायालयाच्या समोरील रस्त्यावरून जात होती. त्यावेळी काही मुले पाठीमागून आली. या मुलांनी पुढे गेलेल्या मुलांवर अचानक हल्ला केला. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले. भर रस्त्यातच मारामारीचा प्रकार सुरू होता. काहींनी या प्रकाराचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या वादावादीची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिस आल्याचे समजताच काही तरुण पसार झाले तर चार तरुणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची पोलिसांकडून कसून चाैकशी सुरू होती. कोणत्या कारणातून हा वाद झाला, हे अद्याप समोर आले नाही. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती.

सातत्याने होतायत वादमहाविद्यालयीन मुलांमध्ये दोन गटांत सातत्याने वाद होत आहेत. काही दिवसांपूर्वी बस स्थानक परिसरातही अशाच प्रकारे वाद झाला होता. मात्र, मुलांनी आपापसात हा वाद मिटविल्यामुळे पोलिसांपर्यंत पोहोचला नाही. अलीकडे महाविद्यालयीन मुलांमध्ये टोळीयुद्ध घडत असून, पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी