म्हसवड : लोधवडे, ता. माण येथील छत्रपती वीर मावळा ग्रुपच्या जवळपास ५० ते ६० मावळ्यांनी कारखेळ, ता. माण येथील वीर संताजी घोरपडे यांच्या समाधी परिसराची संपूर्ण स्वच्छता करून इतरांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला.शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यात ज्या-ज्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावून सहकार्य केले. त्या-त्या सर्वांच्या समाधिस्थळ,जन्मस्थळाची स्वच्छता अभियान राबविले जाते. हे कार्य यापुढेही कायमस्वरूपी चालविणार असल्याची ग्वाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली.यावेळी धनाजी माने, स्वप्नील माने यांच्या उपस्थितीत वीर छत्रपती मावळा ग्रुपचे अध्यक्ष महेश रणशिंगे, सचिन माने, वैभव मोरे, सुहास कदम, बंटी गायकवाड, अनिल कदम, दत्ता गायकवाड, हेमंत सुर्वे, गणेश मगर, दादा भोसले, वैभव दोशी, केदार पवार, सौरभ कदमसह जवळपास ६० कार्यकर्त्यांनी वीर संताजी घोरपडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन समाधी परिसरासह संपूर्ण परिसराची स्वच्छता केली.यापुढेही आदर्श गावचे मार्गदर्शक राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख व सोलापूरचे उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संताजी घोरपडे समाधी परिसराची स्वच्छता
By admin | Published: February 19, 2015 10:24 PM