सातारा : नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करून आता सातारकरांची बोलती बंद झाली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री असलेला उच्चांकी गारठा आणि पार्टीसाठी रात्री उशिरापर्यंत गारठ्यात फिरणं सातारकरांना चांगलेच भोवले आहे. अति गारठ्याने उद्भवलेल्या संसर्गामुळे अनेक सातारकरांची नवीन वर्षात बोलतीच बंद झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून साताऱ्याचा पारा निच्चांकावर येऊ लागला आहे. त्याचा परिणाम सातारकरांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. नववर्षाचे निसर्गाच्या सानिध्यात उत्साहात स्वागत करताना सातारकरांना सर्दी, खोकला आणि घसादुखीचा त्रास जाणवत आहे.
त्यामुळे सध्या प्रत्येक घरात एक रुग्ण अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सध्या औषधोपचार सुरू आहेत. काहींनी घरगुती उपचारांवर भर देण्याचे निश्चित केले आहे.