शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

मलकापूरसह परिसरात ढगफुटीसदृष्य पावसाने हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:29 AM

मुख्य रस्त्यालगचे झाड पडून वाहनाचे नुकसान कृष्णा रूग्णालयासह दत्त शिवम् व विठ्ठलदेव सोसायटीतील घरात पाणी कराड-ढेबेवाडी मार्गासह उपमार्गांना नदीचे ...

मुख्य रस्त्यालगचे झाड पडून वाहनाचे नुकसान

कृष्णा रूग्णालयासह दत्त शिवम् व विठ्ठलदेव सोसायटीतील घरात पाणी

कराड-ढेबेवाडी मार्गासह उपमार्गांना नदीचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : मलकापूरसह परिसराला मंगळवारी दुसऱ्या दिवशी वाऱ्यासह विजांच्या कडाकडाटात ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या जोराच्या पावसामुळे आगाशिव डोंगरावरून आलेल्या जोराच्या पाण्यामुळे दत्त शिवम् व विठ्ठलदेव सोसायटीतील घरात रस्त्यांवरील पाण्याचा प्रवाह घुसला. शहरातील कोळी बिल्डिंगसमोरील मुख्य रस्त्यालगतचे मोठे झाड उन्मळून वाहनांवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गासह उपमार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

मलकापूर परिसरात सोमवारी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही दुपारनंतर तीनच्या सुमारास अचानक सगळीकडे ढग दाटून आले. त्यामुळे दिवस मावळल्यासारखे वातावरण झाले. साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटास सुरुवात झाली. काही क्षणातच ढगफुटीसदृश जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे तीन तास पडलेल्या वाऱ्यासह पावसामुळे मलकापुरातील कोळी बिल्डिंगसमोरील मोठे झाड मुख्य रस्त्यावर उन्मळून वाहनांवर पडले. पालिकेचे कर्मचारी विजय ढवळे यांची दुचाकी झाडाखाली फसल्याने सुमारे साठ हजारांचे नुकसान झाले आहे. तीन तास झालेल्या दमदार पावसाने आगाशिव डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याचा प्रवाह कोयना वसाहत, विठ्ठलदेव सोसायटी तसेच आगाशिवनगरात झोपडपट्टीसह दत्त शिवम् कॉलनीतील काही घरांत रस्त्यांवरील पाण्याचा प्रवाह घुसला.

आगाशिव डोंगरावरून अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आल्यामुळे आगाशिवनगरात देवकरवस्ती ते पवारवस्ती परिसरात दुसऱ्या दिवशीही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांसह नागरिकांना कसरत करावी लागत होती. तीन तास जोरदार पावसाने झोडपल्याने उपमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे दोन्ही बाजूचे उपमार्ग जलमय झाले होते. उपमार्गासह कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

चौकट (फोटो आहे)

भिंतीला भगदाड पाडून पाण्याला मार्ग

कोयना वसाहतमधील नाला तुंबल्याने विजय लांडगे यांच्या घरात पाणी शिरले. चार फूट पाणी साचल्यामुळे संसारोपयोगी सर्व साहित्य भिजले. शेवटी पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून पाण्याला वाट करून द्यावी लागली.

फोटो कॕप्शन

मलकापूरमध्ये मंगळवारी जोरदार पावसाने झोडपून काढले. शहरातील कोळी बिल्डिंगसमोरील मोठे झाड मुख्य रस्त्यावर उन्मळून वाहनांवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. (छाया-माणिक डोंगरे)

फोटो

आगाशिवनगरात झोपडपट्टीसह दत्त शिवम् सोसायटीतील घरात पाणी घुसले. (छाया : माणिक डोंगरे)

फोटो कॕप्शन

कराड-ढेबेवाडी मार्गासह उपमार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांसह नागरिकांना कसरत करावी लागत होती. (छाया-माणिक डोंगरे)

फोटो

मलकापूर येथील लाहोटीनगरमधील रस्त्यांवर चार फूट पाण्याचा प्रवाह वाहत असल्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. (छाया-माणिक डोंगरे)

फोटो कॕप्शन

डोंगरावरील पाण्याचा प्रवाह कृष्णा रुग्णालयात शिरल्याने मुख्य इमारतीमधील काही भागांत पाणीच पाणी झाले होते. (छाया-माणिक डोंगरे)

फोटो कॕप्शन

कराड-ढेबेवाडी मार्गासह उपमार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांसह नागरिकांना कसरत करावी लागत होती. (छाया-माणिक डोंगरे)

फोटो कॕप्शन

आगाशिवनगर येथे इंद्रप्रस्थ कॉलनीतील माने वखार परिसरात सतीश माने यांच्या प्लॉटमध्ये पावसाच्या पाण्याने संरक्षक भिंत कोसळून ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे. (छाया-माणिक डोंगरे)

फोटो कॕप्शन

कराड-ढेबेवाडी मार्गासह उपमार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांसह नागरिकांना कसरत करावी लागत होती. (छाया-माणिक डोंगरे)

फोटो कॕप्शन

आगाशिवनगर येथे इंद्रप्रस्थ कॉलनीतील माने वखार परिसरात सतीश माने यांच्या प्लॉटमध्ये पावसाच्या पाण्याने संरक्षक भिंत कोसळून ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे. (छाया-माणिक डोंगरे)फोटो कॕप्शन

कराड-ढेबेवाडी मार्गासह उपमार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांसह नागरिकांना कसरत करावी लागत होती. (छाया-माणिक डोंगरे)