शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

Satara: टँकरमधील सीएनजी गॅस गळती, चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 6:38 PM

गॅसमुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास..

मलकापूर (जि. सातारा) : सीएनजी गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या वाहनातून अचानक गॅस गळती झाल्याने येथील पुणे-बंगळुरु महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. गॅस गळती बंद झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजी सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक (एमएच- ०४, ईएल- ४००९) हा येलूर (ता. वाळवा) येथे सीएनजी गॅस भरून भुईंज (जि. सातारा) येथे जात होता. पुणे-बंगळुरु महामार्गावर मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी पेट्रोलपंपासमोर आला असता, सिलिंडरमधून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी गॅस मोठ्या प्रमाणावर बाहेर आला व मोठा आवाज झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.महामार्गाशेजारी असलेल्या शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना शेतात हलवण्यात आले. ट्रकचालक संदीप भगवान बनसोडे (रा. कुंडलवाडी, ता. वाळवा) यांनी सिलिंडरचा मुख्य नाॅब बंद करून गाडी महामार्गाकडेला उपमार्गावर लावली. महामार्ग पोलिस व कऱ्हाड शहर पोलिसांसह कऱ्हाड पालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळती बंद झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.

गॅसमुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास..गॅस गळतीचा आवाज अर्धा किलोमीटर परिसरात येत होता. या गॅसच्या वासामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. घरातील नागरिकांनी काही अंतरावर जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला. गॅस टँकर महामार्गाच्या मध्येच असल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे एक तासानंतर परिस्थिती आटोक्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग