बैठकीस संचालक प्रशासन उत्तम इंदलकर, सहसंचालक विकास शेळके, सहसंचालक उपपदार्थ डॉ. संजय भोसले व साखर आयुक्तालयातील अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेती अधिकाऱ्यांच्या आढावा सभेत गाळप हंगामाचा आढावा घेत असताना साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या ऊस तोडणी व वाहतूक प्रश्नांवर मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चर्चा केली. यंत्राद्वारे ऊस तोडणी, अंगद गाडी, बाईंडिंग मटेरियल, ऊस तोडणी, वाहतूक खर्च, मुकादम कमिशन आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. शेती अधिकाऱ्यांनी ऊस तोडणी, वाहतूक खर्च व कमिशनबाबत सर्व कारखान्यांमध्ये समांतर राहील याकडे लक्ष द्यावे. अडचणी व प्रश्न कारखाना व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. ऊस तोडणी वाहतूक खर्चात बचत कशी होईल आणि शेतकऱ्यांना जास्तीच फायदा कसा मिळेल, यासाठी अधिकाऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाकडून आवश्यक ती माहिती वेळोवेळी घ्यावी, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. चालू गळीत हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही, याबाबत शेती अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
फोटो : २१केआरडी०६
कॅप्शन : पुणे येथील साखर आयुक्तालयात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगली व कोल्हापूरच्या गळीत हंगामाचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.