शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

नारळ पावला; पण खापर फुटलं..!

By admin | Published: December 22, 2016 11:21 PM

जनशक्ती’चा कलह चव्हाट्यावर : कऱ्हाडमध्ये ‘राज’कीय भूकंप की पेल्यातील वादळ

कऱ्हाड : काही दिवसांपूर्वीच झालेल्या कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत सत्तांतराचा ‘नारळ’ फुटला आणि ‘लोकशाही’ला ‘जनशक्ती’चा चमत्कारही दिसला; पण प्रचारादरम्यान व्यासपीठावरून ‘सिंह’गर्जना करणाऱ्या एका नेत्याचाच पराभव झाल्याने त्याचे ‘खापर’ही त्या नेत्यांनी स्वकीयांवरच फोडले. परिणामी जनशक्ती आघाडीत सुरू झालेला कलह थांबता थांबेनासा झालाय. एकाच आघाडीच्या नावाने दोन स्वतंत्र नोंदणी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाल्याने हा कलह आता चव्हाट्यावर आलाय. कऱ्हाडातील हे बदलते राजकीय वारे अजून कोण-कोणते रंग बदलणार? कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर राजकीय भूकंप होणार की पेल्यातील वादळ पेल्यातच संपणार, याकडे कऱ्हाडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.गेल्या महिन्यात कऱ्हाड पालिकेची निवडणूक झाली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावच्या या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्री असतानाच कऱ्हाडच्या निवडणुकीतील स्वकीयांचा पराभव पचवलेल्या पृथ्वीबाबांनी यंदाच्या निवडणुकीत मात्र, स्वत: लक्ष घातले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जाधव, यादव, पाटील यांनी जनशक्ती आघाडी मैदानात उतरविली. निकालाअंती त्यांना नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिली; पण सोळा जागा जिंकत जनशक्तीलाच स्पष्ट बहुमत मिळाले.नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव जनशक्तीने लगेच पचविला. मात्र, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा प्रभागात झालेला पराभव अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांना पचता पचेनासा झालाय. दस्तुरखुद्द राजेंद्र यादव यांनी पराभवानंतर ‘माझा पराभव विरोधकांमुळे नव्हे तर काही स्वकीयांमुळेच झाला आहे,’ असा घणाघात केला. त्या गद्दारांना आमचे नेते काय धडा शिकविणार यावर आपण आपली पुढील राजकीय दिशा ठरविणार असल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे कऱ्हाडातील राजकीय समीकरणे नजीकच्या काळात काय काय वळणे घेणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.खरंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविताना सुरुवातीपासूनच काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या. त्यामुळेच पृथ्वीबाबांनाही आपला पक्षीय चिन्हावर लढण्याचा आग्रह सोडावा लागला. मग पुढे उमेदवार निश्चित करतानाही याचे किती, त्याचे किती अन् माझे किती? याचे समीकरण व्यवस्थित न मांडल्याने पृथ्वीबाबांचे गणित कऱ्हाडच्या राजकारणात पुरते फसल्याचे आता नागरिकच बोलू लागले आहेत. कारण पृथ्वीबाबांच्या नेतृत्वाखाली सोळा नगरसेवक निवडून आले असले तरी विजयानंतर यातील किती नगरसेवक पृथ्वीराज चव्हाणांना स्वत:हून भेटायला गेले. हा संशोधनाचाच भाग आहे.वास्तविक, ‘लोकशाही’च्या कारभाराला कंटाळलेल्या कऱ्हाडकरांनी सत्तांतराचा निर्णय अगोदरच घेतला होता. पृथ्वीबाबांनी मुख्यमंत्री असताना दिलेला निधी अन् त्यांचा स्वच्छ चेहरा पालिका निवडणुकीत जनशक्तीच्या कामी आला, हेही नाकारता येणार नाही. शिवाय विस्कटलेली जुनी जनशक्ती आघाडी या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकवटल्याने एकीचं ‘बळ’ही निकालात दिसून आलं; पणं आज सत्तेचं फळ चाखताना अनेकांची तोंडे अनेक दिशेला का?, असा प्रश्न कऱ्हाडकरांना पडला आहे.निकालानंतर एकीकडे फटाक्याची आतषबाजी अन् गुलालाची उधळण सुरू असतानाच यादवांच्या पराभवाचा धक्का त्यांच्यासह नेत्यांनाही बसला. पण त्यानंतर राज्याचं नेतृत्व हाकलेल्या पृथ्वीबाबांना एकामागोमाग एक भूकंपाचे जणू धक्केच दिले जात आहेत. यादवांनी पराभवाचे खापर स्वकीयांवरच फोडले. जनशक्तीचे विजयी नगरसेवक चव्हाणांना भेटायलाही गेले नाहीत. नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार व चव्हाणांची पत्रकार परिषद त्यांना रद्द करावी लागली. त्यामुळे पालिकेत नेमकी कोणत्या नेत्याची सत्ता आली आहे, याचे उत्तर कोणालाच उलगडले नाही. दररोज होणाऱ्या भूकंपांचा केंद्रबिंदू इकडेतिकडे सरकू लागला आहे. अन् त्याचाच एक भाग म्हणून जनशक्ती आघाडीच्या नावानेच दोन स्वतंत्र अर्ज नोंदणीसाठी दाखल झाल्याने सारा कलह चव्हाट्यावर आला आहे. आता या कलहाचा शेवट काय होणार, हे पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागणार आहे. (प्रतिनिधी)म्हणे... ‘गड’ आला; पण ‘सिंह’गेला !खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून राजेंद्र यादव यांची ओळख आहे. त्यांचा कऱ्हाड शहर व परिसरात चांगला लोकसंग्रह आहे. कऱ्हाड पालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिकाही बजावली; पण त्यांच्या पराभवामुळे ‘गड’ आला; पण ‘सिंह’ गेला, अशी धारणा कार्यकर्त्यांची झाली असून, कार्यकर्त्यांचा संताप संपता संपेनासा झालाय....आता न्यायालयीन लढाई की सामोपचार ?...आता न्यायालयीन लढाई की सामोपचार ?‘जनशक्ती’ आघाडीच्या नगरसेविका स्मिता हुलवान यांनी त्यांच्यासह बारा नगरसेवकांची जनशक्ती आघाडी रजिस्टर व्हावी म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर हुलवानांना वगळून १५ नगरसेवकांनी जनशक्ती आघाडीची नोंदणी व्हावी म्हणून स्वतंत्र अर्ज दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकल अ‍ॅथॉरिटी डिस्क्वालिफिकेशन अ‍ॅक्टखाली आता नक्की कोणाला नोंदणी मिळणार, हे पाहावे लागणार आहे. हा वाद सामोपचाराने की न्यायालयीन लढाईनेच मिटणार, हे पाहावे लागणार आहे. स्वीकृत नगरसेवक कोण-कोण ?‘जनशक्ती’ आघाडीकडून सध्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजेंद्र यादव, दिलीप जाधव अन् अतुल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. सोळा जणांची आघाडी एकसंध राहिली तर या आघाडीला संख्याबळाच्या निकषावर दोन सदस्य स्वीकृत मिळू शकतात; पण जर का बारा जणांच्या आघाडीला नोंदणी मिळाली तर जनशक्तीला फक्त एकच स्वीकृत नगरसेवक मिळू शकतो. याचा विचार कोण करणार.अपक्ष इंगवलेंचा जनशक्तीला पाठिंबाप्रभाग क्रमांक तेरामधून अपक्ष म्हणून कश्मीरा इंगवले यांनी गुरुवारी माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या उपस्थितीत जनशक्ती आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी संपतराव इंगवले, अ‍ॅड. विजय पाटील, ललित राजापुरे, संतोष इंगवले, दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती. त्यामुळे आणखी काही अपक्ष नगरसेवकही जनशक्तीलाच पसंती देतील, अशी चर्चाही सुरू आहे.