सातारा : कोयना धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दोन दरवाजे एक फुटांनी उचलून विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी आठच्या सुमारास धरणात १०५ टीएमसी इतका पाणीसाठा होता.पश्चिम भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. सध्याही पावसाची उघडझाप सुरू आहे.
कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात अधून मधून जोरदार सरी पडतात. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होते. त्यातच धरण भरल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करण्यात येतो.
रविवारी सकाळपर्यंत धरणाचे सहा दरवाजे एक फुटावर होते. मात्र, आवक कमी झाल्याने आठच्या सुमारास फक्त दोन दरवाजे एक फुटांवर ठेवून विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या धरणात १५३२ क्यूसेक आवक होत आहे. तर ५२३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.