सातारा : जिल्ह्यात हळूहळू थंडी वाढू लागली असतानाच तीन दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे वातावरणात फरक होऊ लागला आहे. कधी थंडी तर कधी कोवळे ऊनही जाणवते.
रविवारी सकाळी सातारा शहरातील किमान तापमान १८.०८ अंश तर सोमवारी १५.०७ नोंदले गेले. यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतरही काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडला. परिणामी यंदा थंडी पडण्यास थोडा उशीर झाला. मागील काही दिवसांपासून तर जिल्ह्याच्या किमान तापमानात सतत उतार येत चालला होता. त्यामुळे हळूहळू थंडी वाढण्यास सुरुवात झाली. मात्र, पुन्हा किमान तापमान वाढत आहे.सातारा शहरातील किमान तापमान रविवारी सकाळी १८.०८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर शुक्रवारी सकाळी १४.०९ अंशापर्यंत खाली आले होते. दोन दिवसांत जवळपास चार अंशाने किमान तापमान वाढले. त्यामुळे थंडी कमी झाली. त्यातच रविवारच्या तुलनेत सोमवारी सकाळी साताऱ्यातील किमान तापमान १५.०७ अंशावर आले. त्यामुळे थंडीत वाढ झाली. तर सध्या थंडी सुरू झाल्याने सध्या पहाटे फिरणारे नागरिक ऊबदार कपड्यांचा वापर करत आहेत.साताऱ्यातील किमान तापमान असे...
- दि. १ नोव्हेंबर १९.०२
- दि. २ नोव्हेंबर १९.०८
- दि. ३ नोव्हेंबर १७.०४
- दि. ४ नोव्हेंबर १६.०५
- दि. ५ नोव्हेंबर १५.०६
- दि. ६ नोव्हेंबर १४.०९
- दि. ७ नोव्हेंबर १६.००
- दि. ८ नोव्हेंबर १८.०८
- दि. ९ नोव्हेंबर १५.०७