शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ आता थंडगार पाणी!

By admin | Published: March 16, 2017 11:34 PM

कऱ्हाड बसस्थानकात सोय : तापत्या उन्हापासून संरक्षणासाठी लाकडी मंडपही; थंडगार पाण्यासोबत सावलीचाही आधार

संतोष गुरव ल्ल कऱ्हाडसध्या मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने थंडगार पाण्याची व शीत पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र, प्रवाशांच्या सेवेचा विचार करता कऱ्हाड बसस्थानक प्रशासनाकडून प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्यासाठी थंडगार पाण्याची सोय केली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी बसस्थानकात थंडगार पिण्याचे पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आले आहे. वाहतुकीच्या सुविधेबरोबर उन्हाळ्यात थंडगार पिण्याचे पाणी मिळत असल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन वावरणाऱ्या एसटी महामंडळ प्रशासनाने नेहमीच प्रवाशांच्या हिताचा विचार केला आहे. म्हणून तर प्रशासनाकडून प्रवासी व विद्यार्थ्यांसाठी अनेक हितकारक योजना सुरू केलेल्या आहेत. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचे काम ‘एसटी प्रशासनाकडून केले जाते. शालेय विद्यार्थ्यांसाठी मासिक पासची सोय, पर्यटनवाढीच्या दृष्टीने कमी शुल्कातील पर्यटन पॅकेज, मुलींसाठी विविध शासकीय योजनांतून मोफत एसटी प्रवास, तसेच अपंगांसाठी मोफत प्रवासाची सोय अशा प्रकारच्या अनेक योजना एसटी महामंडळ प्रशासनाकडून राबविल्या जात आहेत. त्याचा उपभोगही मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. कऱ्हाड हे सातारा, सांगली, कोल्हापूर, पाटण मार्गाना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून दिवंगत यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षातील शंभर कोटी निधीतून अकरा कोटी रुपये स्थानकाच्या नूतनीकरणासाठी देण्यात आले आहे. या निधीतून स्थानकाच्या सुसज्ज इमारतीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देण्याच्या दृष्टीने येथील प्रशासनाकडून नेहमीच प्रयत्न केले जात आहे.मध्यंतरी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत होती. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बसपासचाही प्रश्न निर्माण झाला होता. सध्या विद्यार्थ्यांच्या समस्येकडे येथील प्रशासनाकडून लक्ष दिले जात आहे. वाढत्या उष्म्यामुळे पाण्याची गरज भासते. त्यावेळी बसस्थानकात पाण्याचीही सोय नसते. त्यामुळे प्रवाशांना बाहेर जावे लागते. ही प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची गरज ओळखत या ठिकाणी एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. तसेच त्यामधील थंडगार पाण्याचे दररोज बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांकडून सेवन केले जात आहे. एसटी प्रशासनाच्या सामाजिक बांधिलकीबद्दल प्रवाशांधून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)