शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

करमणूक करातून साडेतीन कोटी तिजोरीत जमा

By admin | Published: May 12, 2016 10:22 PM

सेट टॉप बॉक्सचा परिणाम : केबलचे २६ हजार तर डिश टीव्हीचे ५२ हजार ग्राहक वाढले

सागर गुजर - सातारासांस्कृतिक तसेच ऐतिहासिक परंपरा दिमाखाने मिरविणारा सातारा मनोरंजनाच्या बाबतीतही मागे नाही. जिल्ह्यातील तब्बल अडीच लाख घरांतील टीव्हींवर केबल व डिश टीव्हीने कब्जा मिळविलेला आहे. या माध्यमातून शासनाला तब्बल ३ कोटी ४८ लाखांचा महसूल जमा होतोय. शहरी भागासाठी केबलच्या ग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसविण्याची सक्ती केली याचा हा परिणाम असून, येत्या डिसेंबर अखेर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील गावांतील टीव्हींना सेट टॉप बॉक्स बसणार आहे. मनोरंजन कराची वसुली व आॅनलाईन चलने भरण्यात सातारा जिल्हा विभागात प्रथम आला आहे. जिल्हा पातळीवर या विभागात केवळ ३ कर्मचारी काम करतात. एवढ्याशा कमी मनुष्यबळाने करमणूक कराच्या वसुलीच्या बाबतीत कोटींची उड्डाणे घेतली आहेत. गेल्या आर्थिक वर्षामध्ये सातारा जिल्ह्यात ६५ हजार ४५० इतकी केबल कनेक्शन होती, त्यात आता वाढ होऊन चालू आर्थिक वर्षामध्ये ती ९१ हजार म्हणजे २६ हजाराने वाढली आहेत. गतवर्षी डीटीएच ची कनेक्शन १ लाख १० हजार २४१ इतकी होती, ती वाढून आता १ लाख ६३ हजार १८९ इतकी झाली आहेत. यामध्येही तब्बल ५२ हजार कनेक्शनची वाढ झालेली आहे. दूरदर्शनचे चॅनेल्स टीव्हीवर मोफत पाहायला मिळतात; पण त्याच ठिकाणी इतर खासगी चॅनेल्सवरील कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायचा झाल्यास त्यासाठी केबल घेऊन अथवा डीटीएच (डिश) यंत्रणा बसवून या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा लागतो. या नव्या यंत्रणेसाठी ग्राहकांच्या खिशाला चाट बसते. केबलसाठी ग्राहक महिन्याला भाडे भरत असले तरी केबल कनेक्शनची संख्या कमी दाखवून काही मंडळी शासनाचा महसूल बुडवत होते; परंतु सेट टॉप बॉक्समुळे आता प्रतिग्राहक १५ रुपये इतका मनोरंजन कर शासनाला भरणे क्रमप्राप्त आहे. सेट टॉप बॉक्सची यंत्रणा संपूर्ण शहरांना सक्तीची केल्याने आता ग्राहक संख्येत वाढ होऊन शासनाच्या महसूलातही वाढ झालेली आहे. कऱ्हाड, हजारमाची, सैदापूर, पाटण, मलकापूर, सातारा शहर, खेड, करंजे तर्फ सातारा, गोडोली, कोडोली, मेढा, रहिमतपूर शहर, कोरेगाव, वाई, सोनगिरवाडी, लोणंद, महाबळेश्वर, पाचगणी, फलटण, कोळकी, म्हसवड ही शहरे व शहरालगतची गावे यांना सेट टॉप बॉक्स बसविणे जिल्हा करमणूक शाखेतर्फे सक्तीचे केले आहे. या परिसरात आणखी ४ हजार कनेक्शन वाढतील, असा अंदाज या विभागाला आहे. जिल्ह्यातील राजलक्ष्मी (लोणंद) व न्यू चित्रा (वाई) या दोन सिनेमागृह चालकांनी करमणूक करमाफी स्विकारलेली नाही, तर इतर सिनेमागृहांनी करमाफीचा लाभ घेतला आहे. राधिका सिनेमागृहाने करमाफीचा लाभ घेतला असला तरी सिनेमागृह कायमस्वरुपी बंद केले आहे.डिशची वसुली जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावीडिशची मनोरंजन करवसुली मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होते. हा महसूल जिल्ह्याच्या तिजोरीत जमा होत नाही. तसेच डिश टीव्ही निर्मिती अथवा विक्री करणाऱ्या कंपन्यांवरही सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही, हे नियंत्रण स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे आले तर डिश टीव्हीच्या मनोरंजन कर वसुलीत आणखी वाढ होऊ शकते.