सातारा : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक योजना व गृहविलगीकरणमध्ये असलेल्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे मंगळवारी सर्व सरपंचांशी व्हिडिओ काॅन्स्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी साडेचार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला जाणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. त्याची अंमलबजावणी करणे, गृहविलगीकरणमधील रुग्णांवर नियंत्रण ठेवणे, यासाठी गाव पातळीवरील ग्रामपंचायत कार्यकारिणी आणि ग्राम दक्षता समिती यांनी सक्रिय होऊन काम करणे, यासाठी आढावा बैठकीत संवाद साधला जाणार आहे. तसेच यावेळी कोरोना वाढ रोखण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.
........................................................................