खटाव : भांडेवाडी ते शिंदेवस्ती रस्ता सुधारणा करण्याच्या कामाचा प्रारंभ शुक्रवार, दि. १ रोजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्याहस्ते झाला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांच्या फंडातून मंजूर करण्यात आलेल्या या रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली होती. त्याच्या दुरुस्तीची मागणी या परिसरातील नागरिकांतून होत होती.
त्यावेळी माजी सरपंच बबनराव घाडगे, मुगुटराव पवार, दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य वैभव वाघ, शीतल झिरपे, किरण राऊत, श्रीकांत जोशी, पी. टी. शिंदे, मनोज देशमुख, विजय बोबडे, रसूलभाई मुल्ला,राजाराम शिंदे, जयदीप शिंदे, प्रतीक विधाते, कैलास शिंदे, संतोष दळवी, तुकाराम शिंदे, सतीश शिंदे, बबन शिंदे, जयाजी माने, तानाजी जमदाडे, रवींद्र कुंभार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सदस्य युवराज शिंदे यांनी स्वागत केले. रमेश शिंदे यांनी आभार मानले.