आदर्की : ब्रिटिशकाळात मीटरगेज रेल्वेलाइन सुरू झाली, त्यानंतर ब्रॉडगेज रेल्वेलाइन सुरू झाली त्यावेळी कोळशावर, डिझेलवर चालणारे इंजिन हद्दपार होऊन विद्युतीकरणाचे काम सुरू झाले. विजेवर चालणाऱ्या इंजिनामुळे गाडीचा वेग वाढणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मिरज-पुणे लोहमार्ग पुणे, सातारा, सांगली या तीन जिल्ह्यांतून जात आहे. ब्रिटिशकाळात सुरू झाला त्यावेळी प्रवासी व मालवाहतुकीसाठी कोळशावर, वाफेवर चालणारे इंजिन होते. त्यासाठी पुणे, जेजुरी, नीरा, सालपे, जरंडेश्वर आदी स्टेशनवर साखळीद्वारे बोअरमधील पाणी इंजिनमध्ये भरले जात होते. त्यानंतर १९७२ मध्ये ब्रॉडगेज लोहमार्ग झाला. त्यावेळी सातारा रोड रेल्वेस्टेशन बंद झाली तर सातारा, जरंडेश्वर, राजेवाडी, आंबळे, शिंदवणे फुरसुंगी ही नवीन स्टेशन सुरू झाली. त्यानंतर डिझेल इंजिन आले; पण मिरज-पुणे लोहमार्ग घाट व डोंगर, बोगदे असल्याने डिझेल जादा लागत होते.
(चौकट)
ग्रामीण भाग शहराशी जोडणार..
आता मिरज-पुणे लोहमार्गावर विद्युतीकरणाचे काम विद्युत खांब, विद्युत स्टेशन, तारा ओढण्याचे काम वेगाने सुरू आहे. विद्युतीकरणाच्या कामामुळे गाडीचा वेग वाढणार असल्याने ग्रामीण भाग शहराशी जोडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात छोटे उद्योग धंदे वाढणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
२४आदर्की
फोटो - वाठार-लोणंद स्टेशनदरम्यान लोहमार्गासाठी विद्युतीकरणाचे काम सुरू आहे.