कोडोली (ता. कऱ्हाड) येथे ज्येष्ठ नेते सुभाष जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंचांसह नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. कोडोली गावच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून मीनाक्षी कैलास जगताप यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हानिफ शिकलगार, संदीप होनकळसे, अर्चना वाघमोडे, विद्या शिंदे, शीला जगताप, सुजाता लोकरे, विक्रम थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवराज मोरे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी एका विचारांचे लोक या निवडणुकीत सहभागी होत असतात. स्थानिक पातळीवरील राजकारण पाहता, या निवडणुका पार पडत असतात. निवडून आलेले सदस्य तसेच सरपंच, उपसरपंचांनी सर्वांनी विश्वासात घेऊन गावात विकासकामे करावीत. गटातटाचे राजकारण न करता गावाचा सर्वांगीण विकास साधावा.
विकास पाटील, माजी उपसरपंच घनश्याम जगताप, भरत जगताप, दिलीप जगताप, नामदेव पाटील, संदीप मोरे, संजय साळुंखे, प्रताप जगताप, महादेव पाटील, दीपक शिंदे, उत्तम पाटील, कैलास जगताप, दत्तात्रय सूर्यवंशी, अभिजित जगताप यावेळी उपस्थित होते.
फोटो : २८केआरडी०२
कॅप्शन : कोडोली (ता. कऱ्हाड) येथे नूतन सरपंच मीनाक्षी जगताप यांचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.