शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कचरा डेपो विरोधात समिती

By admin | Published: January 27, 2016 10:59 PM

सातारा तालुका : सोनगावच्या ग्रामसभेत ठराव मंजूर; तीव्र संघर्षाचाही इशारा

शेंद्रे : गेली २० वर्षे सोनगाव ग्रामस्थांच्या दृष्टीने संवेदनशील असलेला कचरा डेपोचा विषय गंभीर बनला आहे. त्याच्या विरोधात आंदोलन व तीव्र संघर्षाचा इशारा सोनगाव ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलनाबरोबरच न्यायालयीन मार्गानेही कायमचाच प्रश्न निकाली काढण्याचा ठरावही प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा गावच्या हद्दीत सातारा नगरपरिषदेचा कचरा डेपो आहे. वर्षानुवर्षे या कचरा डेपोचे दुष्परिणाम परिसरातील ग्रामस्थांना भोगावे लागत आहेत. उघड्यावर असणाऱ्या या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. सद्य:स्थितीत तर डेपोच्या बाहेर रस्त्यापर्यंत कचरा फेकला जात आहे. येथून वाहनारा ओढ्याचा प्रवाह नदीच्या मुख्य पात्रात मिसळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावाला होत असणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आरोग्याच्या जटिल समस्या निर्माण होत आहेत.तसेच पेटवल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड प्रमाणात धूर निर्माण होत आहे. घाणीमुळे बेवारस कुत्र्यांचा प्रचंड प्रमाणात वावर असल्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. माशांचा प्रादुर्भाव ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.या सर्व घटकांमुळे सोनगाव हद्दीतील हा कचरा डेपो महाभयानक समस्या बनला आहे. मानवी आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या कचरा डेपोच्या विरोधात आता सोनगावकरांनी रस्त्यावर उतरण्याचा नारा दिलेला आहे.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्रामसभेत कचरा डेपो विरोधात आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी एक समिती स्थापन केली आहे. त्याच बरोबर समितीसमवेत ग्रामपंचायतीचे सदस्य व गठित केलेली समिती कचरा डेपोविरोधात योग्य ती आंदोलनाची दिशा व कार्यवाही करणार आहे.कोणत्याही राजकीय दबाव व भूलथापांना बळी न पडता सनदशीर व कायदेशीर मार्गाने आम्ही आमच्या न्यायहक्कासाठी लढणार आहोत, असा निर्धार सोनगावकर ग्रामस्थांनी केला आहे. (वार्ताहर) कचरा डेपोमुळे गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्या विरोधात आम्ही आंदोलनाबरोबरच न्यायालयीन मार्गाचाही अवलंब करणार असून, आता माघार नाही. आम्ही या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडेही दाद मागणार आहोत. - संतोष मुळीक, समिती सदस्य.