शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

सातारा शिक्षक बँकेचं ‘पुस्तक’ बदललं; बँकेवर समितीचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:34 PM

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शिक्षक बँकेच्या रणधुमाळीचा शेवट मतमोजणीनंतर गुलालाच्या उधळणीने संपला. मतमोजणीवेळी दोन ठिकाणी संघ ...

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शिक्षक बँकेच्या रणधुमाळीचा शेवट मतमोजणीनंतर गुलालाच्या उधळणीने संपला. मतमोजणीवेळी दोन ठिकाणी संघ तर तीन ठिकाणी समितीने निसटता विजय मिळवला. उर्वरित जागांवरही टस्सल लढती झाल्या. तथापि, एकूण २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवत समितीने शिक्षक बँकेची सत्ता काबीज केली.कऱ्हाड-पाटण मतदारसंघात शिक्षक संघाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. येथे महेंद्र जानुगडे यांनी ६९६ मते मिळवत शिक्षक समितीच्या संजय नांगरे (३८०) यांच्यावर मात केली. नागठाणेत समितीचे विशाल कणसे यांनी संघाच्या तुषार घाडगे यांचा १५८ मतांनी पराभव केला. आरळे मतदारसंघात संघाचे नितीन राजे यांनी समितीच्या मनोहर माने यांचा २७ मतांनी पराभव केला. स्वाभिमानी परिवर्तनने घेतलेल्या २३ मतांचा फटका समितीला बसला.परळी मतदारसंघात समितीचे तानाजी कुंभार यांनी संघाच्या विश्वास कवडे यांच्यावर १४८ मतांनी मात केली. जावळी मतदारसंघात संघाचे विजय शिर्के यांनी समितीच्या शामराव जुनघरे यांच्यावर अवघ्या ४ मतांनी मात केली.महाबळेश्वरमध्ये समितीचे संजय संकपाळ यांनी स्वाभिमानीचे सुशांत मोतलिंग यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवला तर वाईमध्ये समितीच्या नितीन फरांदे यांनी संघाचे राहुल हावरे यांना ७२ मतांनी पराभूत केले. खंडाळा मतदारसंघात समितीच्या विजय ढमाळ यांनी संघाचे दशरथ ननावरे यांचा १०९ मतांनी पराभव केला. फलटण मतदारसंघात समितीच्या शशिकांत सोनवलकर यांनी संघाचे लक्ष्मण शिंदे यांचा ६२ मतांनी पराभव केला.गिरवी-तरडगाव मतदारसंघात समितीच्या राजेंद्र बोराटे यांचा अवघ्या पाच मतांनी विजय झाला. अपक्ष नितीन करे यांना ३ मते मिळाली तर २ मते बाद झाली. या ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली. मात्र, त्यानंतरही राजेंद्र बोराटेच विजयी झाले.कोरेगाव मतदारसंघात समितीच्या नितीन शिर्के यांनी १३१ मतांनी संघाचे अरुण घोरपडे यांचा पराभव केला.खटाव मतदारसंघात समितीचे नवनाथ जाधव यांनी शिक्षक संघाच्या दत्तात्रय गोरे यांना १७४ मतांनी मात दिली तर मायणी मतदारसंघात संघाच्या शहाजी खाडे यांनी ४१ मतांनी समितीच्या आबासाहेब जाधव यांचा पराभव केला.म्हसवड मतदारसंघात शिक्षक संघाचे राजाराम तोरणे यांना अवघ्या दोन मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांना २०९ मते पडली तर समितीच्या विजय बनसोडे यांना २११ मते मिळाली. विशेष म्हणजे येथे सहा मते बाद झाली.

ओबीसी प्रवर्गात समितीला मोठा विजयओबीसी प्रवर्गात समितीच्या किरण यादव यांनी १६३२ मतांनी मोठा विजय मिळवला. याठिकाणी क्रॉस वोटिंग झाल्याने किरण यादव यांच्या पारड्यातच जादा मते पडली. त्यांना उच्चांकी ५१४५ मते मिळाली. महिला राखीव मतदारसंघात शिक्षक समितीच्या पुष्पलता बोबडे आणि निशा मुळीक यांनी विजय मिळवला तर अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघात शिक्षक समितीच्या ज्ञानबा ढापरे यांनी शिक्षक संघाचे किशोर पवार यांचा १०८० मतांनी पराभव केला. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात शिक्षक समितीचे नितीन काळे यांनी शिक्षक संघाचे विशाल गिरी यांचा ८३६ मतांनी पराभव केला.

रहिमतपूरला कुस्ती असली तर दोस्तीच भारीरहिमतपूर मतदारसंघात शिक्षक समितीचे सुरेश पवार अवघ्या चार मतांनी निवडून आले. टस्सल झालेल्या या लढतीत त्यांना २५४ तर संघाचे पृथ्वीराज गायकवाड यांना २५० मते मिळाली. पवार आणि गायकवाड दोघेही मित्र आहेत. मात्र, दोस्ती असूनही त्यांच्यात कडवी लढत झाली. मतमोजणीवेळी दोघेही उमेदवार खेळीमेळीत गप्पा मारत बसले होते.

बिदाल पॅटर्नमुळे दहिवडीत समितीचा विजय सुकरबिदाल येथे ८६ सभासद शिक्षकांनी एकत्र येत समितीच्या संजीवन जगदाळे यांना समर्थन देण्याची शपथ घेतली होती. संजीवन जगदाळे यांनी मतांनी ११२ मतांनी विजय मिळवला.जगदाळेंना ३०९ मते पडली तर संघाचे महेंद्र अवघडे यांना १९७ मते पडली. स्वाभिमानी परिवर्तनच्या आबासाहेब नाळे यांना १२ मते पडली.

‘स्वाभिमानी’चा लढा; पण यश दूर...नागठाणे, आरळे, परळी, महाबळेश्वर, फलटण, दहिवडी या सहा ठिकाणी स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाले आहे. ‘स्वाभिमानी’ आघाडीने शिक्षक बँकेत प्रथमच तीसरा पर्याय उभा करून प्रचाराचे रान पेटवले होते. मात्र, शिक्षक सभासदांना हा पर्याय साफ नाकारला. या आघाडीला निवडणुकीत सपशेल हार पत्करावी लागली.

सभासदांनी या निवडणुकीत क्रांती घडवली व तळमळीच्या कार्यकर्त्यांना संधी दिली. योग्य व्यक्तींच्या हाती बँकेचा कारभार असावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची परिपूर्ती करण्यासाठी बांधील राहू. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभारी आहोत. - बळवंत पाटील, माजी चेअरमन, प्राथमिक शिक्षक बँक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकElectionनिवडणूक