सातारा : सातारा जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण झाल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सातारकरांनाही सोसावा लागला. इंटरनेट शिवाय काम करणार अशक्य असल्याने अनेकांनी चक्क सुट्टी टाकून आराम करणे पसंत केले.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर महानगरांमध्ये कामासाठी गेलेल्या काही सातारकरांनी वर्क फ्रॉम होम हा पर्याय निवडला. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना महानगरांमध्ये राहण्याचा मोठा खर्च वाचला होता. घरात वायफाय कनेक्शन घेऊन लॅपटॉप वर सुरळीत काम सुरू असताना सोमवारी सकाळीच इंटरनेट बंद पडल्याने त्यांचे कामही ठप्प झाले. जिल्ह्यात अचानक उद्भवलेल्या परिस्थितीची कल्पना देऊन नेट पूर्ववत होत नाही तोवर काम करणे अशक्य असल्याचे फोन द्वारे या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
गेल्या एक वर्षाहून अधिक काळ ऑनलाइन काम सुरू आहे. कुटुंबीयांबरोबर राहुन काम करण्यासाठी फक्त इंटरनेटची गरज होती. त्यासाठी वायफाय घेतले आणि काम सुरळीत सुरू झाले. आज अचानक नेट बंद पडल्याने कंपनीला फोन करून याची माहिती दिली. - सम्राट आहेरराव, सातारा