कऱ्हाड : निसर्ग हा सगळ्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यापुढे आपले काहीही चालू शकत नाही. अतिवृष्टी अन् महापूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. सरकारचे प्रयत्न त्यापुढे पुरूच शकत नाहीत. यातून बाहेर पडण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळेच मनसे पूरग्रस्तांबरोबर आहे, असे मत शर्मिला राज ठाकरे यांनी व्यक्त केले.बुधवार, दि. १४ रोजी कऱ्हाड येथील पूरग्रस्त लोकांना शर्मिला ठाकरे यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, शहराध्यक्ष सागर बर्गे, माजी नगरसेवक दादा शिंगण, नितीन महाडिक, राजेंद्र कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे म्हणाल्या, कऱ्हाडमधील पाटण कॉलनीतील जुन्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यावर ही मंडळी त्याच धोकादायक घरात राहत असून, सरकारने त्यांना पक्की घरे बांधून द्यावीत, अशी मागणी करत त्यासाठी पाठपुरावा करणार आहे,ह्ण अशी ग्वाही दिली.मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पुरविण्याचे काम सुरू आहे. यापुढेही ही मदत प्रत्येक पूरग्रस्तापर्यंत जाईल, याची व्यवस्था करणार असल्याचे त्या म्हणाल्या. कऱ्हाडच्या पुराची पाहणी केल्यानंतर त्या सांगलीकडे रवाना झाल्या.
नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी सामुदायिक प्रयत्न गरजेचे : शर्मिला ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 1:45 PM
निसर्ग हा सगळ्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यापुढे आपले काहीही चालू शकत नाही. अतिवृष्टी अन् महापूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. सरकारचे प्रयत्न त्यापुढे पुरूच शकत नाहीत. यातून बाहेर पडण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळेच मनसे पूरग्रस्तांबरोबर आहे, असे मत शर्मिला राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देनैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी सामुदायिक प्रयत्न गरजेचे : शर्मिला ठाकरेकऱ्हाडला पूरग्रस्तांची केली विचारपूस