सातारा : पोवई नाक्यावर नव्याने करण्यात आलेल्या ग्रेडसेपरेटरचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन नुकतेच प्रशासनास देण्यात आले आहे. ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण झालेले नाही. भुयारी मार्ग अद्याप बंदच आहेत. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला तहसील कार्यालयापुढे एकेरी रस्ता आहे.
बचत गटांमार्फत सावित्रीबाई जयंती
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : स्त्रियांना ज्ञानाची कवाडे खुली करून प्रचलित समाजरुढीविरुद्ध झगडणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सरताळे (ता. जावळी) येथील बचत गटातील महिलांनी साजरी केली.
याप्रसंगी आशा जमदाडे, रेहनाज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बचतगटातील सर्वच महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून सावित्रीचे रुप परिधान केले होते. कार्यक्रमास प्रेरिका मीनाक्षी मोरे, वैशाली जमदाडे, संगीता ननावरे, अंगणवाडी सेविका सुषमा गायकवाड, आशासेविका विद्या पवार, ग्रामसंघाच्या सचिव माधवी नवले आदी महिलांची उपस्थिती होती.