शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

कृषियंत्र निर्मितीसाठी सामंजस्य करार!

By admin | Published: December 13, 2015 10:48 PM

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कापूस वेचणी यंत्र विकासावर लक्ष केंद्रित केले असून, या यंत्रावर संशोधन करण्यात येत आहे.

जगदीश कोष्टी-- सातारा -=निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून विदर्भातील कैक शेतकरी फाशीचा दोर जवळ करत असल्याचे चित्र दिसत असतानाच दुसरीकडे याच पट्ट्यातला बळीराजा आपला माल खपवण्यासाठी मोठ्या धाडसाने नवनवीन प्रांत हुडकू लागल्याचे आशादायक दृश्य आढळून आले आहे. नवी बाजारपेठ शोधण्यासाठी कोलंबसने जसा अमेरिकेत पाय ठेवला होता, अगदी तसेच विदर्भातील काही शेतकरीही स्वत:च्या शेतातील शेकडो टन संत्रे घेऊन पश्चिम महाराष्ट्रात स्वतंत्र बाजारपेठ तयार करू लागले आहेत. विशेष म्हणजे, त्यांचं दु:ख हलकं करण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांऐवजी अमरावतीची संत्री घेण्यास सातारकरही प्राधान्य देत आहेत.अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील तरुण संत्री उत्पादक शेतकरी योगेश गावंडे हे साहेबराव देशमुख यांच्यासमवेत सध्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकासमोरील बाजार समिती परिसरात संत्री विकण्यासाठी आले आहेत. गावंडे यांनी स्वत:च्या नऊ एकर जागेत संत्र्यांची बाग केली आहे. बागेच्या जागेवर व्यापाऱ्यांना अवघे नऊ ते दहा रुपये किलो दराने संत्री विकावी लागतात. या कमी दरात उत्पादन खर्चही निघत नाही. खर्च आणि उत्पन्न यांचं गणितं चुकलं की शेतकरी अडचणीत येतो. त्यामुळे गावंडे यांनी व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने न विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कष्ट करण्याची तयारीही दाखविली. सुमारे साडेसातशे किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी सातारा गाठले आहे. भर उन्हात साताऱ्याच्या फूटपाथवर स्टॉल लावून हे दोघेही अमरावतीकर संत्री विकत आहेत. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील तेरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बचतगट तयार केला आहे. हा बचतगट शासनाच्या कृषी समृद्धी समन्वित कृषी विकास प्रकल्पाला जोडला आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना संत्री वाहतुकीसाठी लागणारा तीस टक्के खर्च दिला जाणार आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांमार्फतच एक पत्र त्या-त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले गेले आहे. या पत्रात शेतकऱ्यांसाठी संत्री ठेवण्यासाठी गोडावून व विक्रीसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे साताऱ्यातील काही स्थानिक व्यापाऱ्यांचा विरोध झाला मात्र त्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांनीही कमी दराने संत्री विकण्यास सुरूवात केली आहे.तरी प्रशासकीय पातळीवर विदर्भाच्या शेतकऱ्यांना अभय मिळाले आहे. साताऱ्यातील अतिक्रमणे काढली जात असताना या शेतकऱ्यांना मात्र सूट मिळाली आहे. कऱ्हाड कृषी प्रदर्शनात १० टन विक्रीया शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी कऱ्हाड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात हजेरी लावली होती. त्याठिकाणी चक्क दहा टन संत्र्यांची विक्री झाली. तेव्हाच पश्चिम महाराष्ट्रात आपल्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळू शकेल, हे या शेतकऱ्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वत:च संत्रा विक्रीची ठिकाणे निश्चित केली. विशेष म्हणजे, स्थानिक व्यापाऱ्यांनी कमी दराने विक्री सुरू केली असली तरी सातारकरांनी अमरावतीतील शेतकऱ्यांकडून संत्रे खरेदी करण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. तेरा बचत गट कार्यरतसाताऱ्यात येण्यासाठी अमरावतीच्या तेरा शेतकऱ्यांनी बचत गट केला आहे. प्रत्येक शेतकरी दोन टन संत्री घेऊन येणार आहे. एकाची विक्री झाली की, दुसरा शेतकरी येणार आहे. तेराही शेतकऱ्यांना नंबर येऊन गेल्यानंतर पुन्हा पहिल्याचा नंबर येणार आहे. यामुळे प्रत्येकाला संधी मिळणार आहे.आमची कोणाशीही स्पर्धा नाही. केवळ जागेवर संत्री विकणे परवडत नसल्याने आम्ही साताऱ्यात आलेलो आहोत. सातारकरही आमच्या कष्टाला दाद देत विदर्भातल्या संत्र्याची आवर्जून खरेदी करत आहेत.- योगेश गावंडे, संत्री उत्पादक शेतकरी, वरुड, ता. अमरावती