चाफळ : चाफळ विभागातील खालची केळोली (ता. पाटण) येथील अंगणवाडी शाळेच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी संगणकाची चोरी केली. या घटनेने विभागात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.
चाफळ विभागातील खालची केळोली येथे अंगणवाडी शाळेची इमारत आहे. या बंद असलेल्या इमारतीमधील संगणक चोरट्यांनी शाळेच्या दरवाज्याचे कुलूप तोंडून शाळेत प्रवेश करत लंपास केला आहे. शुक्रवारी सकाळी अंगणवाडी सेविका शाळेत गेल्या असता ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच उंब्रज चाफळ पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. लवकरात लवकर चोरीचा छडा लावून चोरांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे आश्वासन यावेळी पोलिसांनी दिले. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली चाफळ पोलीस दूरक्षेत्राचे अमृत आळंदे, सुशांत शिंदे तपास करत आहेत.