मसूर: कांबिरवाडी (ता. कऱ्हाड) येथील पारायणाची टाळ, मृदंगाच्या निनादात व ज्ञानोबा माउली, तुकारामच्या जयघोषात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांच्या सहभागाने काढलेल्या दिंडीने गावचे ग्रामदैवत येडोबा व मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालून सांगता करण्यात आली.
सात दिवस चाललेल्या या पारायण सोहळ्यात गावचे भजनी मंडळ तसेच मधुकर दीक्षित मसूर, दीपक दाभाडे, बाजीराव दाभाडे रिसवडकर, अविनाश चव्हाण कालगाव, ज्ञानेश थोरात अंधारवाडी, ओंकार थोरात हणबरवाडी, बाळासाहेब पाटील कोणेगाव, नामदेव काशीद निगडी, शिवाजी पवार चिखली, आबा पवार धोंडेवाडी, जगन्नाथ कुंभार कवठे यांनी सुश्राव्य संगीत भजन सादर केले. पारायण सोहळ्यात हरिपाठ व भजन गायन असा कार्यक्रम पार पडला. पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थ, युवक यांनी परिश्रम घेतले.
२२ मसूर
कांबिरवाडी येथे पारायण सोहळ्याच्या सांगतेदिवशी दिंडी काढण्यात आली.