शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कमळ न फुलता काँगे्रसचा हात गाळात, सातारा जिल्ह्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 1:39 PM

मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी ह्यकमळह्ण फुलले नाही. तरीदेखील काँगे्रसची वाताहत सुरू राहिली. सर्वच ठिकाणी टप्प्या-टप्प्याने काँगे्रसची पडझड होत गेली. काँगे्रसचा हात आणि पायही गाळात चालला असला तरी तो ओढून काढण्याचा प्रयत्न प्रमुख नेत्यांकडून होताना दिसत नाही. गेल्या चार महिन्यांपासून काँगे्रसचे जिल्हाध्यक्षपद रिकामे आहे. या परिस्थितीत कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत.

ठळक मुद्देकमळ न फुलता काँगे्रसचा हात गाळात, सातारा जिल्ह्यातील स्थितीविधानसभा निवडणुकीत तयारीचा अभाव; गत चार महिन्यांपासून पक्ष नेतृत्वाविना

सागर गुजर 

सातारा : मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी कमळ फुलले नाही. तरीदेखील काँगे्रसची वाताहत सुरू राहिली. सर्वच ठिकाणी टप्प्या-टप्प्याने काँगे्रसची पडझड होत गेली. काँगे्रसचा हात आणि पायही गाळात चालला असला तरी तो ओढून काढण्याचा प्रयत्न प्रमुख नेत्यांकडून होताना दिसत नाही. गेल्या चार महिन्यांपासून काँगे्रसचे जिल्हाध्यक्षपद रिकामे आहे. या परिस्थितीत कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत.संपूर्ण देशात मोदी लाटेमुळे २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही काँगे्रसला बाजूला सारून भाजपने राज्याची सत्ता काबीज केली. संपूर्ण देशात आणि राज्यात भाजपचा वारू वेगाने पुढे जात होता. तरीदेखील सातारा जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना विशेष यश मिळवता आले नव्हते. जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघात कमळ फुलले नव्हते. तसेच शिवसेनेलाही पाटण वगळता कुठेही चमक दाखवता आली नाही.जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा मजूर फेडरेशन, बाजार समित्या यांच्या निवडणुका त्यानंतर झाल्या तरी देखील भाजपला रोखून धरून राष्ट्रवादीने या सर्वच संस्थांवर आपला वरचष्मा ठेवला. सत्ताधारी भाजपशी राष्ट्रवादीने दोन हात केले.हे एका बाजूला सुरु असताना काँगे्रस मात्र अंतर्गत वादात गुरफटली होती. काँगे्रसचे जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या आमदार आनंदराव पाटील यांना ज्यांनी तीव्रतेने विरोध केला, तीच मंडळी काँगे्रससोबत राहिली नाहीत. जे काठावर राहून काँगे्रसची वाताहत पाहत होते, त्यांनी ऐनवेळी बुडून जाण्याच्या भीतीने भाजपच्या नौकेत पाय ठेवला.

आमदार आनंदराव पाटील यांना बाजूला करून पक्षाने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व दिले. निंबाळकर मोठा बदल करणार, राष्ट्रवादीला चारीमुंड्या चित करणार, अशा वल्गना काँगे्रस कार्यकर्ते व्यक्त करत होते, तेव्हाच वाईचे माजी आमदार मदन भोसले यांनी काँगे्रस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

भोसलेंच्या कार्यकर्त्यांना तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह यांनी प्रायश्चित्त दिले. भोसले यांना मानणाऱ्या जिल्ह्यातील विविध तालुक्यांची कार्यकारिणी त्यांनी बरखास्त केल्या. काँगे्रसची कार्यकारिणी बरखास्त करणारे जिल्हाध्यक्षच भाजपच्या कळपात जाऊन बसले.सध्याच्या घडीला वाई शहर-तालुका, खंडाळा, सातारा तालुका, महाबळेश्वर, फलटण शहर- तालुका इथल्या काँगे्रसच्या कार्यकारिणी बरखास्त झालेल्या आहेत. जावळी, कोरेगाव, माण-खटाव, कऱ्हाड उत्तरमधील काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना नेमकी भूमिका काय घ्यायची? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तर कऱ्हाड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटात मनोमिलन झाले की नाही? याबाबतही कार्यकर्त्यांना स्पष्ट कळालेले नाही.

मलकापूर नगरपालिका आणि कऱ्हाड दक्षिणमधील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काका-बाबा गटांचे मनोमिलन झाले. मात्र, या दोन प्रमुख नेत्यांमधील अबोला कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँगे्रसचे विचार पेरत अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी प्रचार हाती घेतलाय; परंतु या ठिकाणी काँग्रसचे कार्यकर्ते अजूनही एकजुटीने कामाला लागलेले दिसत नाहीत.जिल्हा परिषद व पंचायत समितींमध्ये काँगे्रसचे सदस्यत्व लक्षणीयरीत्या घटले आहे. सध्याच्या घडीला बिदाल (अरुण गोरे), वाठार किरोली (भीमराव पाटील), पुसेसावळी (सुनीता कदम), विंग (शंकर खबाले-पाटील), कोपर्डे (निवास थोरात), वारुंजी (मंगल गलांडे) हे सात जिल्हा परिषद गट काँगे्रसच्या ताब्यात राहिले आहेत. शून्य असणाऱ्या भाजपने जिल्हा परिषदेत सातवर मजल मारली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत गटातटांत विभागलेली काँगे्रसची शकले पडत असताना ते जोडण्यासाठी कोण पुढाकार घेणार? हा प्रश्न आहे.काँगे्रसकडे कऱ्हाड दक्षिण आणि माण-खटाव या दोन जागा येऊ शकतात. त्या हाती पडतील, अशी काँगे्रस नेत्यांची अपेक्षा आहे. राज्यात भाजप आक्रमक आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी करताना हट्ट धरून चालणार नाही. यातून दोन्ही पक्षांचे नुकसान होऊ शकते, अशी भावना काँगे्रसच्या जाणकार कार्यकर्त्यांमध्ये आहे.

काँगे्रसने जिल्ह्यात सुवर्णकाळ अनुभवला आहे. काँगे्रस कार्यकर्ता अभिमानाने कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायला तयार होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. १९९९ साली काँगे्रसच्या वाहनात बसायला कोणी तयार नव्हतं, तीच परिस्थिती आताही आहे. आम्ही अजूनही आशावादी आहोत. काँगे्रसची पडझड थांबवण्यासाठी पक्षाची एकजूट आवश्यक आहे.- अ‍ॅड. विजयराव कणसे,कार्याध्यक्ष, काँगे्रस 

टॅग्स :congressकाँग्रेसSatara areaसातारा परिसर