शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, अन्यथा गुन्हा दाखल; घाटकोपर दुर्घटनेनंतर सातारा पालिका सतर्क 

By सचिन काकडे | Published: May 14, 2024 6:57 PM

तीन दिवसांची मुदत,

सातारा : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सातारा पालिका सतर्क झाली असून, पालिकेने शहरातील सर्व होर्डिंग व फ्लेक्सधारकांना मंगळवारी नोटीस जारी केली. होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तीन दिवसांत पालिकेत सादर करावा, अन्यथा होर्डिंग जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी (दि. १३) एका पेट्रोल पंपाजवळ महाकाय होर्डिंग कोसळल्याने १४ जणांना आपला जीव गमवावा लागला तर, ७५ हून अधिक नागरिक जखमी झाले. या घटनेनंतर राज्यातील होर्डिंगचा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. सातारा पालिका प्रशासनानेदेखील खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या जागेवर व खासगी मिळकतींवर लावणाऱ्या होर्डिंग व फ्लेक्सधारकांना मंगळवारी नोटीस बजावली. होर्डिंगधारकांनी ज्या इमारतीवर होर्डिंग उभारले आहे त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, मिळकतधारकांशी केलेला करारनामा, मिळकतदार व सातारा पालिकेने होर्डिंगसाठी दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र आदी दस्तऐवज तीन दिवसांत पालिकेत सादर करावा, असे नोटिसीत नमूद केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून होर्डिंग जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर