सातारा : काँग्रेस पक्षाची नवीन जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी जाहीर केली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना यामध्ये संधी देण्यात आलेली आहे.
जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जयवंत जगताप, अविनाश फाळके, पोपटराव काकडे, एम. के. भोसले, चंद्रकांत ढमाळ, निवास थोरात यांची, तर खजिनदार म्हणून बाळासाहेब कदम, सरचिटणीसपदी मंगला गलांडे, नानासाहेब पाटील, मोहनराव बर्गे, वंदना धायगुडे, संजीव साळुंखे, अॅड. दत्तात्रय धनावडे, नरेश देसाई, शंकर लोखंडे, सलीम बागवान, विष्णू अवघडे, विश्वंभर बाबर, विलास पिसाळ, चिटणीसपदी राजेंद्र चव्हाण, अविनाश नलावडे, नजीम इनामदार, राजेंद्र डोईफोडे, भरत जाधव, राहुल चव्हाण, विकास गोंजारी, अतुल संकपाळ, अमर करंजे यांना संधी देण्यात आली आहे.
तर सदस्य म्हणून मारुती जाधव, नंदकुमार जगदाळे, दुर्गेश मोहिते, अॅड. नरेंद्र पाटील, राजेंद्र यादव, विद्या थोरवडे, अशोक पाटील, प्रदीप जाधव, विशाल चव्हाण, आनंदराव जाधव, राजेंद्र कदम, राजेंद्र घाडगे, शिवाजीराव गायकवाड, शिवाजीराव खामकर, अभिजित पाटील, शरद नाळे, विजय बनसोडे, शिवाजीराव महानवर, शिवाजी जगताप, मंजिरी पानसे, संदीप चव्हाण यांना घेण्यात आले. कार्यकारिणी सदस्य म्हणून युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिरसाट व मनोजकुमार तपासे, प्रदेश युवकचे सचिव शिवराज मोरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष विलास थोरात, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमित जाधव यांचा समावेश केला आहे.