शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

गुजरात निवडणुकीत काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांकडे दिली मोठी जबाबदारी, महत्वाच्या पाच नेत्यांमध्ये समावेश

By प्रमोद सुकरे | Published: November 14, 2022 6:40 PM

यावेळच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने कंबर कसली असून गुजरात राज्याच्या पाच विभागाची जबाबदारी महत्वाच्या पाच नेत्यांवर सोपविली आहे.

कराड : गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना बडोदा व अहमदाबाद या विभागाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.पत्रकात म्हटले आहे की, पृथ्वीराज चव्हाण गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर पुढील ४ दिवस असणार आहेत. येथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन संवाद साधणार आहेत. तसेच या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकार परिषदा सुद्धा होणार आहेत. चव्हाण यांनी भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात आदरांजली अर्पण केली.गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने प्रचाराची रणनीती आखली असून मागील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला चांगलीच टक्कर दिली होती. यावेळच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने कंबर कसली असून गुजरात राज्याच्या पाच विभागाची जबाबदारी महत्वाच्या पाच नेत्यांवर सोपविली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार मुकुल वासनिक यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.गुजरात काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तमरित्या जबाबदारी याआधी निभावली आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने २००४ साली गुजरात मध्ये १२ खासदार निवडून आणले आहेत. त्याच वर्षी या निर्णायक गुजरात च्या खासदारांच्या संख्येमुळे काँग्रेस हा लोकसभेत १ नंबर चा पक्ष ठरला होता आणि काँग्रेस पक्ष मित्र पक्षांच्या साहाय्याने सत्तेवर आला होता. हि महत्वाची घटना काँग्रेस मुख्यालयात नोंद असल्याने यावर्षीच्या गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रमुख विभागांची जबाबदारी दिलेली आहे.असेही पत्रकात म्हटले आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस