सातारा : काँग्रेसचे नेते आणि संसदेतील विरोधी नेते राहुल गांधी सोमवारी महाबळेश्वर येथे येत आहेत. हा त्यांचा खासगी दौरा आहे.सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, काही तातडीच्या खासगी कामासाठी राहुल गांधी यांना महाबळेश्वर येथे जावे लागत आहे. त्यामुळे राहुल गांधी हे दिल्लीहून पुणे येथे दि. १५ रोजी आले आहेत. पुण्यात रात्री मुक्काम केल्यानंतर ते दि. १६ रोजी सकाळी ९.३०च्या दरम्यान महाबळेश्वर येथे पाेहोचतील.येथील निकटवर्तीयांची भेट घेतल्यानंतर साधारणत: दोन ते अडीच तास ते महाबळेश्वर येथे असतील. त्यानंतर ते पुन्हा पुण्याकडे रवाना होणार आहेत. खासगी दौरा असल्यामुळे याबाबत प्रशासनाला तसेच पक्ष कार्यकर्त्यांना कळविण्यात आले नसल्याचे समजते.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज महाबळेश्वरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:58 IST