साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर लोकसभेसाठी साताऱ्यात उद्या काँग्रेसची बैठक

By नितीन काळेल | Published: February 28, 2024 04:12 PM2024-02-28T16:12:40+5:302024-02-28T16:14:24+5:30

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर मतदारसंघाबाबत चर्चा आणि आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षक, तालुकाध्यक्षांची ...

Congress meeting tomorrow in Satara for Sangli, Kolhapur with Satara Lok Sabha | साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर लोकसभेसाठी साताऱ्यात उद्या काँग्रेसची बैठक

साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर लोकसभेसाठी साताऱ्यात उद्या काँग्रेसची बैठक

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर मतदारसंघाबाबत चर्चा आणि आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षक, तालुकाध्यक्षांची महत्वाची बैठक उद्या, गुरुवारी (दि २९) साताऱ्यात होणार आहे. यामुळे काँग्रसनेही निवडणुकीची तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आणि माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील आणि विश्वीजत कदम यांच्या सूचनेवरुन विधानसभा मतदारसंघ प्रभारींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील निरीक्षक आणि तालुकाध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक दि. २९ फेब्रुवारीला सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत होणार आहे. 

या बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा आढावा काँग्रेसच्या सचिव सोनलबेन पटेल या घेणार आहेत. यावेळी काँग्रेसचे सातारा जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते अॅड. विजयराव कणसे, अजितराव पाटील-चिखलीकर, रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव आदी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, गुरुवारी सकाळी ११ ला सातारा जिल्ह्याची बैठक होणार आहे. तर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत सांगली जिल्हा आणि त्यानंतर साडे तीन ते पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी केले आहे.

Web Title: Congress meeting tomorrow in Satara for Sangli, Kolhapur with Satara Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.