शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
3
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
4
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
5
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
6
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
7
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
8
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
9
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
10
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
11
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
12
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
13
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
14
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
15
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
16
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
17
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
18
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
19
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
20
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 

सातारा पालिकेत दोन्ही राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा बसणार? महाविकास आघाडीबाबत विचारमंथन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 2:08 PM

सातारा पालिकेची होऊ घातलेली निवडणूक रंगतदार होणार असून, खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले काय रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सातारा : सातारा पालिकेच्या रणांगणात शड्डू ठोकण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सातारकरांना तिसरा पर्याय देण्याबाबत विचारमंथन करण्यात आले.सातारकरांसाठी आजवर तिसरा पर्याय उभा न राहिल्याने राजधानीतील निवडणुकीचा सामना राजे विरुद्ध राजे असाच रंगत आला आहे. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही राजे भाजपवासी झाल्याने पालिकेचा गड काबीज करण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व अपक्षांनीदेखील मोट बांधली आहे. साताऱ्यात मंगळवारी आ. शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याची प्रचिती आली.साताऱ्यातील अनेक प्रश्न आजवर सुटलेले नाहीत. जनतेला पायाभूत सेवासुविधा उपलब्ध होत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी, जनतेच्या विकासासाठी, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी यंदा तिसरा पर्याय निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. या मागणीला सर्वांनीच दुजोरा दिला. या निर्णयामुळे सातारा पालिकेची होऊ घातलेली निवडणूक रंगतदार होणार असून, खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले काय रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बाबर, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, ज्ञानदेव कदम, विजय निकम, प्रा. विक्रांत पवार, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, प्रणव सावंत, अमय गायकवाड, गिरीश मोडकर, स्नेहा अंजलकर, सलीम कच्छी, अमित कदम, अमृता पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूकUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेShashikant Shindeशशिकांत शिंदे