सातारा : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस या इंधनावरील लावलेल्या बेसुमार करामुळे सामान्य जनतेचे जगणे अवघड झाले आहे. मोदी सरकारच्या हिटलरशाहीमुळे हे घडते आहे, असा आरोप करीत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण जिल्हा व तालुका स्तरावर उपोषण, आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी हटाव, देश बचाव..., मागे घ्या... मागे घ्या...इंधन दरवाढ मागे घ्या, मोदी सरकार हाय-हाय, काळे कायदे रद्द करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, ॲड. विजयराव कणसे, बाळासाहेब शिरसाट, नाना लोखंडे, धर्यशील सुपले, मनोज तपासे, ॲड. दत्तात्रय धनवडे, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, शहराध्यक्षा रजिया शेख, माधुरी जाधव, मालन परळकर आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.