खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने, भाजपविरोधात घोषणाबाजी
By नितीन काळेल | Published: December 22, 2023 06:15 PM2023-12-22T18:15:08+5:302023-12-22T18:15:51+5:30
सातारा : केंद्र शासनाने अधिवेशनादरम्यान १४३ खासदारांचे निलंबन केल्याच्या निषधार्थ साताऱ्यात काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार ...
सातारा : केंद्र शासनाने अधिवेशनादरम्यान १४३ खासदारांचे निलंबन केल्याच्या निषधार्थ साताऱ्यात काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
संसदेच्या अधिवेशनादरम्यान केंद्र शासनाने विविध राजकीय पक्षातील १४३ खासदारांचे निलंबन केले आहे. यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे. तर १३ डिसेंबरला सुरक्षा व्यवस्था तोडून संसदेत पिवळा धूर पसरविण्यात आला. ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. उलट या गोष्टीची चौकशी न करता १४३ खासदारांचे निलंबन करण्यात आले. ही अतिशय चुकीची घटना आहे. त्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत, असे काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यामध्ये सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, रफिक बागवान, रजनी पवार, धनश्री महाडिक, सुषमा राजेघोरपडे, मनिषा पाटील, मालन परळकर, संभाजी उत्तेकर, अभय कारंडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.