कोरेगाव : केंद्र सरकारने पेट्रोलदरात वाढ केल्याच्या निषेधार्थ कोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शहरातील पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्ष विजयराव कणसे, जिल्हा सरचिटणीस मनोहर बर्गे, चिटणीस नाजीम इनामदार, तालुकाध्यक्ष श्रीकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
विजयराव कणसे म्हणाले, ‘केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढविल्या असून, पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. कोरोनाकाळात जनता महागाईने कंटाळली आहे. नजीकच्या काळात इंधन दरवाढ कायम राहिल्यास सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होणार आहे.’
पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध नोंदविला. आंदोलनामध्ये जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद जाधव, अजित भोसले, अमरसिंह बर्गे, प्रकाश सावंत, संतोष शेलार, संतोष ढाणे, अधिक जगताप, अनिकेत भोसले, सागर गायकवाड, बबन खंडाईत, जयवंत घोरपडे, सोमनाथ शिंदे, आबा गायकवाड सहभागी झाले होते.