खंडाळा : ‘सर्वसामान्य लोकांच्या व्यथा जाणून तळागाळापर्यंत काम करणारा काँग्रेस पक्ष आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून काँग्रेस पक्षाची वाढ होत आहे. लोकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंपर्कावर भर द्यायला पाहिजे. खंडाळा नगरपंचायतची निवडून जवळ येऊन ठेपली आहे. शहरातील काँग्रेस पुन्हा जोमाने काम करीत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देणार आहे,’ अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
खंडाळा येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, उपसभापती वंदना धायगुडे पाटील, तालुकाध्यक्ष एस. वाय. पवार, वाई विधानसभा युवक अध्यक्ष प्रकाश गाढवे, युवक अध्यक्ष अतुल पवार, शहराध्यक्ष मनीष गाढवे, सत्यवान जाधव, रत्नकांत भोसले, संतोष बावकर, मारुती खंडागळे, दिलीप संकपाळ, हाजीभाई शेख, गणेश घाडगे, अनिल गाढवे, सागर गाढवे यांसह प्रमुख उपस्थित होते.
खंडाळा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गावोगावी पोहोचून लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहिले पाहिजे. खंडाळा नगरपंचायत निवडणूक जवळ असून, सर्व प्रभागात पक्षाचे काम सुरू आहे. त्याला बळ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. शहरात काँग्रेसच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्रित यावे. निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांना ताकदीने लढण्यासाठी बळ देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रकाश गाढवे यांनी स्वागत केले. संतोष बावकर यांनी आभार मानले.
फोटो आहे...
०९खंडाळा
खंडाळा येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, उपसभापती वंदना धायगुडे पाटील, तालुकाध्यक्ष एस. वाय. पवार, प्रकाश गाढवे आदी उपस्थित होते.