प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मलकापूर (कºहाड) नगरपालिकेची निवडणूक काँग्रेसने जिंकली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदार संघातील या निवडणुकीकडे विधानसभेची सेमिफायनल म्हणून पाहिले जात होते. दरम्यान, भाजपने या निवडणुकीत जोरदार तयारी केली; पण त्यांना बहुमतापर्यंत पोहोचता आले नाही.कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी या मतदार संघाचे नेतृत्व सलग सातवेळा केले आहे. तर सध्या पृथ्वीराज चव्हाण या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. भाजपचे डॉ. अतुल भोसले त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.गत विधानसभा निवडणुकीत कृष्णा उद्योग समूहाचे डॉ. अतुल भोसले यांनी पृथ्वीबाबांशी फारकत घेत भाजपची वाट चोखाळली, काँगे्रसच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांविरोधात अतुल भोसले यांनी दंड थोपटले तर विलासराव पाटील-उंडाळकरांनी बंडखोरी केली. मात्र, दक्षिणवर ‘पृथ्वीराज’च अवतरले; पण पृथ्वीबाबा काँगे्रस व विलासकाका काँग्रेसमध्ये दरी वाढत गेली. दरम्यानच्या काळात भाजपने डॉ. अतुल भोसलेंना ताकद द्यायला सुरुवात केली. पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद बहाल करीत राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला अन् विकासनिधीसाठीही झुकते माप दिले.गत विधानसभेनंतर कºहाड पालिकेची निवडणूक झाली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत भाजपने नगराध्यक्षपदाचे कमळ फुलविले. बहुमत पृथ्वीबाबा यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला मिळाले; पण काही दिवसांतच आघाडीचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. त्यामुळे पृथ्वीबाबांना त्रास सहन करावा लागत आहे. तर पंचायत समितीवर बंडखोर माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांनी झेंडा फडकाविला.काही महिन्यांपूर्वी मलकापूर पालिका झाली. त्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काही महिने कºहाड दक्षिणमधील नगरपरिषदेची होणारी ही निवडणूक पृथ्वीबाबाअन् अतुलबाबा यांच्यासाठी तर विधानसभेची सेमिफायनल मानली जात होती. देशात, राज्यात भाजप सत्तेत आहेच; पण कºहाड पाठोपाठ आता मलकापुरात कमळफुलवून अतुल भोसले आपला विधानसभेचा मार्ग सुलभ करू पाहात होते. त्यामुळे पृथ्वीबाबांसाठी सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्त्वाचीहोती.मलकापूरच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना होणार, हे निश्चित होते; पण काँगे्रसला ही निवडणूक तितकीशी सोयीची नव्हती. मात्र, काँग्रेस अंतर्गत गटबाजीला आळा घालत उंडाळकर गटाला बरोबर घेण्याचे कसब ‘मनोहारी’ नेतृत्वाने दाखविले. गेले दीड वर्ष ‘बाबा-काका’ गटाच्या मनोमिलनाची चर्चा होती. मात्र, या निवडणुकीत या मनोमिलनावर शिक्कामोर्तब झालेले दिसले. राष्ट्रवादीनेही यात सहभाग घेतला अन् भाजप विरोधात सर्वजण एकत्रित आले. त्याचा फायदा झाल्याचे या निकालावरून स्पष्ट दिसतेय.या निकालाने दक्षिणेतील काँगे्रस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढायला नक्कीच मदत होईल. पृथ्वीबाबाअन् विलासकाका काँगे्रसने यापुढेही एकदिलाने अशीच वाटचाल केल्यास कºहाड दक्षिणची ‘काँगे्रसचा बालेकिल्ला’ ही ओळख काम राहायला मदत होईल,असे जाणकारांना वाटते. काँग्रेसचे कार्यकर्ते चार्ज झाले असल्याचे दिसून येते.एकीचे बळ... मिळाले फळमलकापूर नगरपालिका निवडणुकीत प्रथमच पृथ्वीराज बाबा अन् विलासकाका गट एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. काँगे्रस अंतर्गत दोन्ही गटांचे एकीचे बळ निर्माण झाल्यानेच या निवडणुकीत विजयाचे फळ त्यांना चाखायला मिळाले, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.भाजपच्या अतुल भोसलेंची एकाकी झुंजही चर्चेची...मलकापूरच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सगळी काँगे्रस एकवटली होती. काँग्रेस अंतर्गत बाबा-काका गटातील दरी मिटल्याचे दिसले. तरी देखील भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी एकाकी झुंज देत निवडणुकीत रंग भरला.त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक कमालीची अटीतटीची बनली. त्यात काँगे्रसने नगराध्यक्षपदासह चौदा जागा जिंकल्या. तर भाजपला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले.मात्र, काँगे्रसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपच्या उमेदवारावर २७० मतांची आघाडी घेत विजयी झाला. त्यामुळे भोसलेंची निवडणुकीतील एकाकी झुंजही चर्चेची ठरली आहे.‘नर्स’ची डॉक्टरवर मातमलकापूरच्या या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या धनगर समाजाच्या होत्या. पैकी भाजपच्या उमेदवार डॉक्टर तर काँग्रेसच्या उमेदवार नर्सिंगचे शिक्षण घेत आहेत. निकालानंतर ‘नर्स’ने डॉक्टरवर मात केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
विधानसभेची सेमिफायनल काँग्रेसने जिंकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:55 PM