शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

‘तमाशा’ टाळून शिवस्मारकाची उभारणी

By admin | Published: March 02, 2015 9:46 PM

कण्हेरीत उपक्रम : यात्रेतील कार्यक्रमांना फाटा दिला

खंडाळा : कण्हेरी, ता. खंडाळा या गावाने यात्रेतील पारंपरिक तमाशा व इतर कार्यक्रमांना फाटा देऊन त्यावरील होणाऱ्या खर्चातून गावात तरुणांना प्रेरणादायी ठरेल, असे शिवस्मारक उभारण्याचे ठरविले आहे. यासाठी गावातील सर्व जातीधर्माचे लोक एकत्र आले असून, सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श त्यांना ठेवला आहे.खंडाळा तालुक्यातही अशा यात्रांना प्रारंभ झाला आहे. यात्रा म्हटलं की, तमाशा-कुस्त्यांचे फड गावोगावी रंगतात. लाखो रुपयांचा खर्च तमाशा व मनोरंजनात्मक कार्यक्रमावर केला जातो. मात्र, कण्हेरी हे गाव तसे पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव आहे. या गावात हिंदू-मुस्लीम यासह विविध जातीधर्माचे लोक राहतात. तसेच राजकीय, सामाजिक परिस्थितीतून अनेक तरुण मंडळेही तयार झाली होती. मात्र, छत्रपती शिवरायांच्या नावाखाली सर्वांनी एकत्र काम करणार आहेत. सर्व मंडळे बरखास्त करून श्री शिवराय सर्वांगीण विकास संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्याच माध्यमातून गावात यापुढे सर्वधर्मीय, कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला असल्याचे सरपंच विजय चव्हाण यांनी सांगितले.गावचा सर्वांगीण विकास साधून आदर्श गाव निर्मितीचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्या माध्यमातून जलसंधारणाची कामे, वनराई बंधारे, ग्रामस्वच्छता, संपूर्ण शौचालये वापर, सांडपाणी व्यवस्थापन या कामांनाही गती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)तांब्याची जुनी भांडी केली जमागावातील सर्वधर्मीय तरुणांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. पूर्वी गावात अलसेल्या शिवपुतळ्याच्या जागी उत्तम दर्जाचे शिवस्मारक उभारण्याचा सर्वांनी संकल्प केला आहे. त्यासाठी तरुणांनी गावातून जुनी तांब्याची भांडी जमा केली आहेत. त्यापासून मूर्ती घडविणार आहोत. एकोप्यामुळे गावचा विकास होण्यास मदत होणार आहे, असे कण्हेरीचे सरपंच विजय चव्हाण यांनी सांगितले.