शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
3
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
4
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
5
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
6
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
7
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
8
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
9
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
10
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
11
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
12
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
13
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
14
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
15
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
16
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
17
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
18
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
19
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
20
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या

शेद्रे येथील उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळला, चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 7:22 PM

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डानपुलावरून कंटेनर २५ फुटावरून सेवारस्त्यावर कोसळला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. मात्र, या अपघातावेळी सेवा रेस्त्यावर वाहतूक नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा अपघात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देशेद्रे येथील उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळलासेवा रस्त्यावर रहदारी नसल्याने अनर्थ टळला

शेंद्रे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डानपुलावरून कंटेनर २५ फुटावरून सेवारस्त्यावर कोसळला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. मात्र, या अपघातावेळी सेवा रेस्त्यावर वाहतूक नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा अपघात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास झाला.मच्छिंद्र आबासाहेब चितळे (वय २४, रा. धनगरवाडी चेकेवाडा, माणिक दौंडी, जि. अहमदनगर) असे जखमी चालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, चालक मच्छिंद्र चितळे हा एकटाच कंटेनर घेऊन कोल्हापूरहून पुण्याकडे निघाला होता. शेंद्रे येथील उड्डानपुलावर आल्यानंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर पुलाचा संरक्षक कठडा तोडून सुमारे २५ फुटावरून सेवा रस्त्यावर कोसळला.

यावेळी मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी आवाजाच्या दिशेने घटनास्थळी धाव घेतली. सेवा रस्त्यावर कंटेनरखाली कोणी सापडले आहे का, याची नागरिकांनी खातरजमा केली. मात्र, कोणीही नसल्याचे पाहून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळल्याने कंटेनरचा अक्षरश: चक्काचूर झाला.

सेवा रस्त्यावर लोकवस्ती असून, या ठिकाणी नेहमी रहदारी सुरू असते. मात्र, या अपघातावेळी सेवा रस्त्यावर रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी कंटेनर चालकाला बाहेर काढून त्याला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविले.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर