शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

ठेकेदारी, गुंडगिरी, हप्तेखोरी कोणामुळे?

By admin | Published: November 16, 2016 12:15 AM

वेदांतिकाराजे भोसले : भर सभागृहात उमेदवारांना का रडावे लागले..?

सातारा : ‘गेली दहा-बारा वर्षे मी समाजकार्यात आहे. मी नगरपालिकेचा कारभार पारदर्शक आणि गतिमान करू शकते; पण केवळ आमदाराची बायको म्हणून मी नगराध्यक्ष व्हायचे नाही? रंजना रावत यांच्याबाबतीत तुम्ही काय केले? का तुम्ही निवडून आलेल्या लोकांना असे वागवता? पारंपरिक ठेकेदारी, गुंडगिरी, हप्तेखोरी कोणामुळे चालते? शहरात कोणाची दहशत आहे? भर सभागृहात उमेदवारांना का रडावे लागते? यालाच प्रेम आणि जिव्हाळा म्हणायचा का?,’ असा खडा सवाल नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वेदांतिकाराजे भोसले यांनी केला. प्रभाग ५ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ गोडोली येथे झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी ‘नविआ’चे उमेदवार शेखर ऊर्फ आण्णासाहेब मोरे-पाटील, मनीषा काळोखे, भरतदादा सपकाळ, पंडितराव मोरे, वामनराव म्हस्के, सजन कुडाळकर, अरुण मापारी, मधुकर कुंभार, बाळासाहेब माने, अण्णासाहेब साळुंखे, भाई जगताप, लक्ष्मण मोरे-पाटील, व्यंकटराव मोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ‘अपप्रवृत्तींच्या विरोधात जात-पात, धर्म बाजूला ठेवून संपूर्ण गाव एकवटला असून, ही एकी कायम ठेवा, असे आवाहन करून वेदांतिकाराजे म्हणाल्या, ‘गेली दहा वर्षे तुम्ही वकिली थाट अनुभवला; पण दहा वर्षांत गोडोलीकरांना पाणी मिळाले नाही, ही खरी शोकांतिका आहे. पालिकेला एक सक्षम, कार्यक्षम अध्यक्ष आणि काम करणारे नगरसेवक पाहिजेत. ही काळाची गरज आहे. मनोमिलन होणार अशी आमची अपेक्षा होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे स्वत:हून दादांना नगराध्यक्षपद देत होते; पण चर्चाच नाही तर, मग कालवण कसे होणार? मनोमिलन का तुटले, हे आजपर्यंत आम्हाला माहीत नाही, असे वेदांतिकाराजे म्हणाल्या. काम कोण करतंय हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. सातारा शहराचा विकास साधण्यासाठी प्रशासनावर नियंत्रण ठेवणारा, कामकाजात पारदर्शकता आणि लोकसहभाग वाढवणारा नगराध्यक्ष हवा आहे. तुम्हाला वाटेल तसे मान डोलावणारा नगराध्यक्ष देऊन सातारा शहराचे आणि नागरिकांचे नुकसान करायचे का?,’ असा परखड सवाल वेदांतिकाराजे यांनी उपस्थित केला. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भरत संकपाळ, उमेदवार काळोखे, शेखर मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभागातील अपक्ष उमेदवारांनी माघार घेऊन नगरविकास आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी) कोणावरही आरोप करणार नाही... ‘मी कोणावरही आरोप करणार नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. मी फक्त विकासाच्या, कामाच्या आणि सक्षमतेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून, मला सातारा शहराचा विकास साध्य करायचा आहे,’ असेही वेदांतिकाराजे म्हणाल्या.