यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, संचालक आनंदराव पालकर, शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, सह्याद्री कारखान्याचे संचालक लहुराज जाधव, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, अॅड. रणजितसिंह जगदाळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सुभाषराव जोशी म्हणाले, मसूर ग्रामस्थांनी पूर्वीपासूनच बँकेस चांगला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच बँकेचे मसूरशी जिवाभावाचे नाते निर्माण झाले आहे. या उपक्रमामुळे बँक घरोघरी पोहोचली आहे. आजपर्यंत बँकेने निरनिराळ्या गावांत, शैक्षणिक संस्थांमध्ये, मंदिरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या देऊन स्वच्छताकार्यास मदत केली आहे. मसूर गावची विस्तारवाढ होत असताना या ठिकाणी ट्रॅक्टर, टेम्पो, जेसीबीचे वितरण झाले. याचा अर्थ म्हणजे गावचे चित्र बदलत चालले आहे. गाव सोलरसिटी बनवणे, पाण्याची योजना, इत्यादी कामे होत आहेत. यातून गाव प्रगतिपथावर आहे.
यावेळी मानसिंगराव जगदाळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, सरपंच पंकज दीक्षित, डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी मनोगत व्यक्त केले. बँकेचे महाव्यवस्थापक महेश वेल्हाळ, विभागीय सचिव अतुल शिंदे, विलासराव कांबीरे, आर. पी. साळुंखे, डॉ. रमेश लोखंडे, डॉ. इम्तियाज मुल्ला, दिलीप पाटील, कादर पिरजादे, मोहन पवार, दिनकर शिरतोडे, हिमांशू शहा, विकास पाटोळे, दिनकर शिरतोडे, प्रकाश माळी, मोहन यादव उपस्थित होते. मसूर शाखेचे व्यवस्थापक अमर भोकरे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. जितेंद्र धर्माधिकारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता शिवाजीराव पाटोळे यांनी पसायदान म्हटल्यानंतर झाली.
फोटो : १७केआरडी०४
कॅप्शन : मसूर (ता. कऱ्हाड) येथे अर्बन बँकेच्या वतीने डस्टबिनचे वाटप करण्यात आले. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मानसिंगराव जगदाळे, पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे उपस्थित होते.