मसूर : सह्याद्री साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालून सह्याद्री सभासद शेतकऱ्यांच्या हक्काचा करण्यासाठी समविचारी लोकांना बरोबर घेत सर्वपक्षीय सर्वसमावेशक विरोधी पॅनेल उभे करण्याचा निर्धार मसूर येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.सह्याद्री कारखाना निवडणुकीत पॅनेल उभारण्यासंदर्भात कऱ्हाड उत्तर मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मसूर येथील सुयोग मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी धैर्यशील कदम, संपतराव माने, भीमराव पाटील, एम. जी. थोरात, मारुतीशेठ जाधव, हिंदुराव चव्हाण, सुनील पाटील, सुदाम दीक्षित, डॉ. शंकरराव पवार यांची उपस्थिती होती.बैठकीत सह्याद्री कारखाना राजकीय अड्डा झाला आहे. प्रस्तापितांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराने सभासद शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे. साखरेला ३२०० रुपये दर असताना ती वेळीच विकली गेली नाही, त्यामुळे सभासदांचे शंभर कोटींचे नुकसान झाले आहे, असा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हक्काचे पॅनेल उभारुन निवडणूक लढण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. धैर्यशील कदम म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांचा ऊहापोह झाला एकास एक लढत झाली असती तर आपला विजय निश्चित होता. यावेळी मतांच्या विभागणीचा फायदा विरोधकांना झाला. शनिवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले.’यावेळी हिंदुराव चव्हाण, मारुतीशेठ जाधव, जितेंद्र भोसले, शंकरराव पवार, एम. जी. थोरात, भीमराव पाटील, सुरेश घोलप, संपतराव भोसले, भीमराव डांगे, सुदाम दीक्षित, दुर्गेश मोहिते मानले. (वार्ताहर)शनिवारी अर्ज दाखल करणारधैर्यशील कदम यांनी शिवसेनेत जाणार या वृत्ताचे खंडन करत काँगे्रसने आपणाला भरपूर दिले आहे. ‘मी कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा विश्वासघात करणार नसल्याचे सांगून निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावरून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नका, प्रत्येक निवडणुकीत नवीन उमेदवार उभा राहतो, तो पुन्हा दिसत नाही, या प्रस्थापितांचा भ्रम नाहीसा करणार आहे. येत्या शनिवारी निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सह्याद्रीचारणसंग्राम
मनमानी कारभाराला लगाम घालू
By admin | Published: February 13, 2015 12:13 AM