सातारा : कोणताही सण असला की जनतेत उत्साह दांडगा असतो. ग्रामीण भागातून लोक शहराकडे येतात. गणेशोत्सवात तर सातारा शहरात मोठी गर्दी असते. याचा ताण नेहमीच पोलिसांवर येत असतो. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी रस्ता वाहतूक सुरक्षा दलाचे सुमारे शंभर बालजवान धावून आले आहेत. त्यांनीच साताऱ्यांच्या वाहतुकीवर नियंत्रण मिळविले आहे की काय असे वाटू लागले आहे. गणेशोत्सव काळात होणारी वाहतुकीची कोंडी व वाहतुकीच्या नियमांचे उलंघन करणाऱ्या वाहनधारकांवर नजर ठेवण्यासाठी सातारा शहरातील मुख्य चौकात वाहतूक पोलिसांबरोबर ‘आरएसपी’चे छात्रही तैनात झाले आहेत. पोवई नाक्यासह शहरातील मुख्य रस्त्यावर पांढरा शर्ट, पॅन्ट, डोक्याला टोपी घातलेले मुलं वाहतूक नियंत्रित करताना पाहून सर्वांनाच कौतुक वाटत आहे. पण यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांनाच मदत होणार आहे. दररोज वेगवेगळ्या शाळेतील वीस मुलं पोवईनाका, राजवाडा येथील जबाबदारी भक्कमपणे पार पाडत आहेत. तसेच वाहनचालकांना प्रबोधन करत आहेत. वाहतूक सिग्नलनुसार वाहनधारकांना सोडण्याचे कामही हे विद्यार्थी करत आहेत. वाहतूक मित्र मधुकर शेंबडे हे त्यांना मार्गदर्शन करत आहेत.गणेशोत्सवाचे देखावे सुरू होत आहेत. त्यामुळे यापुढचे काही दिवस रात्री अकरापर्यंत वर्दळ असणार आहे. गर्दीत वाहने घुसविल्यामुळे पादचाऱ्यांचेही हाल होत असतात, अशावेळीही हे बालजवान धावून आल्याने मदत होणार आहे. (प्रतिनिधी)चौकात शिट्ट्यांचा गजरवाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी मदत करत असलेल्या ‘आरएसपी’च्या छात्रांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन काही वाहनचालक पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी कोणी नियमांचा भंग करत असल्याचे लक्षात होताच सर्व छात्र मिळून शिट्ट्यांचा एकच गजर करतात. इतर वेळी सिग्नल सुरु होताच प्रत्येक विद्यार्थी शिटी वाजवून वाहनांच्या जाण्याच्या सूचना करतात. यामधून लहान मुलांवर वाहतुकीचे चांगले संस्कार होतात. त्यांची पोलिसांना मदतच होत असते. पण याबरोबरच हे मुलं लहान असल्याने वाहतूक शाखेचे पोलीसही त्यांची काळजी घेत असतात.- श्रीगणेश कानगुडे,सहायक पोलीस निरीक्षकसातारा वाहतूक शाखा
वाहतुकीवर नियंत्रण चिमुकल्यांचे!
By admin | Published: September 20, 2015 9:01 PM