सागर गुजर । सातारा : सातारा शहर व सातारा औद्योगिक वसाहतीसाठी कूपर उद्योग समूहाची अग्निशामक सेवा वरदान ठरली आहे. आगीच्या तांडवावेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून या सेवेतील कर्मचारी देवदूतासारखे तत्काळ धावून जातात आणि अनेकांचे जीव वाचवतात, बहुमूल्य मालमत्तेचेही रक्षण करतात. औद्योगिक वसाहतीसह संपूर्ण सातारा तालुक्यातील जनतेसाठी कूपरचे अग्निशमन दल संकटमोचक ठरलेय!
साताºयातील औद्योगिक परिसर आकाराने मोठा असला तरी आग प्रबंधक व अग्निशामन करणाºया सुविधांच्या बाबतीत जवळपास सर्वच औद्योगिक आस्थापनांमध्ये वानवा आहे. कितीतरी दिवसांपासून सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशामन केंद्राची मंजुरी झाली असली तरी शासनाच्या लाल फितीतून अजून तरी ती बाहेर पडलेली नाही.
आगीच्या घटनेवेळी येथील उद्योजकांना प्रामुख्याने कूपर कार्पोरेशन अथवा सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलावरच विसंबून राहावे लागते. कूपर कार्पोरेशन सुरक्षा विभागातील अग्निशामक दलातील दोन सुरक्षा अधिकारी, बंबाचे तीन चालक व चार अग्निशामक कर्मचारी दिवस असो किंवा रात्र, सुटी असो किंवा सण; संकटसमयी स्वत:चा जीव धोक्यात घालून आगीच्या ठिकाणी तत्परतेने धाव घेतात. अशा सेवेला शासनाच्या वतीने कुठलाच कायदेशीर आधार मिळत नाही. संकटसमयी केलेली मदत विसरू नयेकूपरच्या अग्निशामक दलात अजिंक्य स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था यांच्या वतीने पीयूष माने, राजाराम शिंदे व मधुकर माने हे अग्निशामक चालक तर यशवंत क्षीरसागर, हेमंत काळंगे, सागर पवार व पंकज साबळे हे अग्निशमन कर्मचारी म्हणून तिन्ही पाळीत काम करतात. उसाला लागलेल्या आगी विझविल्याटॉप गिअर, यश इंडस्ट्रीज, परफेक्ट हाऊस, शहरातील मुथा, जुन्या औद्योगिक वसाहतीतील आकर्षण फर्निचर, जनरल रबर प्रॉडक्ट, नारायण मिल, रमेश साळुंखे डेकोरेटर्स आदी ठिकाणी लागलेली आग विझविली.
आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळते. त्याची जाणीव ठेवून पाच-पन्नास हजार रुपये बक्षीस जीव धोक्यात घालणाºया अग्निशामक कर्मचाºयांना मिळायला हवे.- सुनील इंगवले, कामगार संघटनेचे सचिव