कऱ्हाड : माजी खासदार व ज्येष्ठ नेत्या प्रेमिलाकाकी व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी, दि. ८ होणारे कार्यक्रम या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहेत. माजी केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण व माजी खासदार प्रेमिलाकाकी चव्हाण यांचा स्मृतिदिन गुरुवारी आहे. दरवर्षी स्मृतिदिनानिमित्त गुणवंतांचा गौरव तसेच इतर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा सर्व कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आले असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.
कऱ्हाडात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्कार
कऱ्हाड : शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून कऱ्हाडातील महाविहार येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तानाजी बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी बाळकृष्ण झिमरे होते. महासचिव मीनाताई इंजे, स्वाती गायकवाड, नंदकुमार काळे, आनंदीबाई बनसोडे, विदुला मस्के, अनिता झिमरे, रुपेश सावंत, राजेंद्र लादे, सुदाम ढापरे, बाबासाहेब व्यवहारे, मधुकर खराडे, दत्तात्रय काटे आदी उपस्थित होते. आर. बी. पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. राम गायकवाड यांनी स्वागत करून आभार मानले.
बहुजन शिक्षककडून गडावर वृक्षारोपण
कऱ्हाड : येथील सदाशिवगडावर बहुजन शिक्षक परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. बहुजन परिवाराचे केडर जिल्हाध्यक्ष प्रवीण लादे, जिल्हा सचिव उदय भंडारे, तालुकाध्यक्ष सुरेखा वायदंडे, तालुका सचिव महेश लोखंडे, सुनंदा पाटणकर, संगीता वाघमारे, रूपाली काटे, संजय सावंत, बाबासाहेब खरात आदी उपस्थित होते. वृक्षारोपण अंतर्गत सदाशिव गार्डनमध्ये वडाची रोपे लावण्यात आली. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने गडाचे संवर्धन व वृक्षारोपण हाती घेतले आहे.