मलकापूर : कोरोनाच्या संकटामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार बुडाले आहेत. कोरोनामुळेच देशातील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाचे हे संकट देशासाठी युद्धापेक्षाही महाभयंकर संकट आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय दुसरा उपाय नाही. देशपातळीवरील नेतृत्वाच्या अभावामुळे व काही लोकांच्या अहंकारामुळे देशापुढील हे संकट अधिक गडद होत आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मलकापूर, ता. कऱ्हाड येथे नगरपालिकेच्या वतीने प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते दिवंगत आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, रणजित देशमुख, डॉ. सुरेश जाधव, अजितराव पाटील, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन विकास व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, इंद्रजित चव्हाण, शंकर खबाले, नामदेव पाटील, वैशाली वाघमारे, उत्तमराव पाटील, विद्याताई थोरवडे, धनाजी काटकर, नरेंद्र पाटील, झाकिर पठाण, सतीश माने, नगरसेवक सागर जाधव, जयंत कुराडे, गणेश चव्हाण, हणमंत शिंगण, शहाजी पाटील, राहुल मर्ढेकर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानदेव साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले.
(चौकट)
कोरोनामुळे अनाथ झालेल्यांचे पालिका पालक
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नवीन ना. आनंदराव चव्हाण शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. मलकापुरातील ज्या मुला-मुलींच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा मुला-मुलींचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा खर्च पालिकेच्या वतीने करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
चौकट
आजचे प्रमुख कार्यक्रम
१) माझी वसुंधरा अभियानामध्ये पालिकेने राज्यात तृतीय व स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात २५ वा तर दक्षिण भारतात ११ वा क्रमांक प्राप्त केला. त्यांचे स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र वितरण, २) प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेअंतर्गत मुदतठेव पावती वितरण, ३) गुणवंतांचा सत्कार
(चौकट)
राज्यासाठी महिन्याला तीन कोटी डोसची गरज
कोरोनाच्या संकटाला राज्याने धाडसाने तोंड दिले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. दररोज सरासरी दोन लाख लोकांना लसीकरण दिले जाते. हा आकडा वाढवून दररोज किमान दहा लाख लोकांना लसीकरण देण्याची क्षमता राज्यामध्ये आहे. त्यासाठी केंद्राने महिन्याला किमान तीन कोटी लस महाराष्ट्रासाठी उपलब्ध करणे गरजेचे आहे. तशा स्वरूपाचा ठराव विधिमंडळात केला आहे.
फोटो ओळ:
मलकापुरात माझी वसुंधरा अभियानात पालिकेने राज्यात तृतीय व स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात २५ वा तर दक्षिण भारतात ११ वा क्रमांक प्राप्त केला. त्यांचे स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र वितरण व प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेअंतर्गत मुदत ठेव पावती वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (छाया : माणिक डोंगरे)
080721\img-20210708-wa0026.jpg
फोटो कॕप्शन
मलकापूरात माझी वसुंधरा अभियानात पालिकेने राज्यात तृतीय व स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात २५ वा तर दक्षिण भारतात ११ वा क्रमांक प्राप्त केला त्यांचे स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र वितरण व प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेअंतर्गत मुदत ठेव पावती वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (छाया- माणिक डोंगरे)