औंध : मुस्लीम धर्मातील त्याग व पवित्र भावनेचा उत्सव असलेल्या बकरी ईद सणावर यंदाही कोरोनाची छाया होती. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी कोरोना नियमांचे पालन करून घरीच नमाज पठण केले. जगावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी ईश्वराकडे प्रार्थना केली.
औंध परिसरात ईदनामित्त मुस्लीम बांधव इदगाह, मशीदमध्ये सामूहिक नमाज पठण करतात. मात्र, दोन वर्षांपासून निर्बंधांमुळे एकत्र न येता घरीच नमाज पठण करण्याचे शासनाने आवाहन केले आहे. त्यामुळे यंदादेखील शासनाच्या नियमांचे पालन करून घरीच नमाज पठण केले. गळाभेट घेऊन शुभेच्छा देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. जगावर आलेल्या कोरोना महामारीचे संकट लवकर दूर होऊ दे, अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी ईश्वराकडे केली.