सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट मार्च महिन्यापासून सुरू झाल्यानंतर बाधितांचे प्रमाण वेगाने वाढले. सध्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोनाची लाट अजून ओसरलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांची कोरोनामुक्ती अजूनही दूरच आहे.
चौकट :
आतापर्यंत झालेल्या चाचण्या ९२३७३१
बाधित होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) १९.६१
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) ९१.०७
एकूण रुग्ण १८२०००
बरे झालेले रुग्ण १६८००९
उपचार सुरू असलेले रुग्ण ९२६७
मृत ४०९४
सध्या क्रियाशील रुग्ण ५.४ टक्के
कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर रुग्ण ९७३६
तालुकानिहाय अॅक्टिव्ह रुग्ण
खंडाळा ४१०
खटाव १५००
महाबळेश्वर ११३
कऱ्हाड १७८६
कोरेगाव ७१२
फलटण १०६५
माण ५६२
वाई ३२९
सातारा १९०१
चौकट :
अनलॉकनंतर माण तालुक्यात वाढले रुग्ण...
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे दुकानामध्ये गर्दी होत आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. अनलॉकनंतर माण तालुक्यात बाधित वाढत असल्याचे दिसून येत आहे, तर फलटण तालुक्यातील बाधितांचा वेग कमी होऊ लागलाय. सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातही कमी रुग्णसंख्या नोंद होत आहे.
कोट :
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित संख्या वाढल्याचे दिसून आले. आता रुग्णसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे. पण, नागरिकांनी येथून पुढेही शासन नियमांचे पालन करावे. पूर्वीप्रमाणेच प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे, तरच आपल्याला कोरोना विषाणूच्या संकटावर मात करता येईल.
- डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
..............................................................