सातारा : जिल्ह्यात कोरोनावाढीचा दर तीन टक्क्यांच्या खाली आला आहे. मंगळवारी १२ हजार ५०१ तपासण्यांमधून ३५३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले. तर ६ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
फलटण तालुक्यांत सर्वाधिक ७१ तर त्याखालोखाल सातारा तालुक्यात ५४ रुग्ण आढळले आहेत. जावलीत ५, कऱ्हाडमध्ये ५४, खंडाळ्यात १०, खटाव ४२, कोरेगाव ३४, माण ३८, महाबळेश्वर ५, पाटण ५, फलटण ७९, सातारा ५४, वाई १३ व इतर १४ असे आजअखेर एकूण २ लाख ४२ हजार ६५९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच सहा बाधितांचा मृत्यू झाला. खंडाळा १, कोरेगाव १, माण १, सातारा २, वाई १ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार ४७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत १ हजार ९३ जणांना घरी सोडण्यात आले असून असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.